शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 22:59 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : वेंगुर्लेत सर्वाधिक, सर्वात कमी दोडामार्ग तालुक्यात

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून ३ लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ले तालुक्यात तर सर्वात कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0 तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील ५ लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ८३८ मतदान केंद्रांवरून जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ६३२ मतदार आहेत. यात २ लाख ८0 हजार ९१ पुरुष तर २ लाख ८३ हजार ५४१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी मंगळवारी ३ लाख ८0 हजार ७११ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात १ लाख ९४ हजार २४२ पुरुष तर १ लाख ८६ हजार ५६९ स्त्री मतदारांचा समावेश आहे आणि याची टक्केवारी ६७.५५ एवढी आहे. यात वैभववाडी तालुक्यात ३२ हजार ५५४ मतदार असून त्यापैकी २0 हजार ३६३ मतदारांनी मतदान केले. यात ९ हजार ६५५ पुरुष व १0 हजार ७0८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यात ८९ हजार ७४९ मतदार असून त्यापैकी ५९ हजार ४१६ मतदारांनी मतदान केले. यात ३0 हजार १५५ पुरुष तर २९ हजार २६१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. देवगड तालुक्यात ७७ हजार ४५४ मतदार असून त्यापैकी ५१ हजार ५८0 मतदारांनी मतदान केले. यात २५ हजार ९0१ पुरुष तर २५ हजार ६७९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मालवण तालुक्यात ७१ हजार ७९ मतदार असून त्यापैकी ४७ हजार ४४२ मतदारांनी मतदान केले. यात २४ हजार २७९ पुरुष तर २३ हजार १६३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. कुडाळ तालुक्यात १ लाख ३ हजार ९0५ मतदार असून त्यापैकी ७१ हजार ४१ मतदारांनी मतदान केले. यात ३६ हजार ६६२ पुरुष तर ३४ हजार ३७९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. वेंगुर्ले तालुक्यात ५४ हजार २४ मतदार असून त्यापैकी ३८ हजार ७८५ मतदारांनी मतदान केले. यात २0 हजार ३५६ पुरुष तर १८ हजार ४२९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. सावंतवाडी तालुक्यात ९७ हजार ३६१ मतदार असून यापैकी ६८ हजार ६६२ मतदारांनी मतदान केले. यात ३५ हजार १८१ पुरुष तर ३३ हजार ४८१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुक्यात ३७ हजार ५0६ मतदार असून त्यापैकी २३ हजार ४२२ मतदारांनी मतदान केले. यात १२ हजार ५३ पुरुष तर ११ हजार ३६९ स्त्री मतदारांनी मतदान केले आहे. जिल्ह्यात मतदान झाल्यावर मतदारांचा कौल आणि आपल्या पक्षाची मतदारसंघांमध्ये असलेली ताकद याचा अंदाज घेत काही पक्षांच्या उमेदवारांनी अंतर्गत हातमिळवणी करत ही निवडणूक लढविल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र प्रत्येक पक्षाच्यावतीने आपलीच सत्ता येईल अशी ग्वाही दिली जात आहे. मात्र खरे चित्र हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)