शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:26 IST

रत्नागिरी : सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला ...

रत्नागिरी : सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.३७ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानासाठी असलेली गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेचे विनायक राऊत, स्वाभिमानचे नीलेश राणे, वंचित बहुजन आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी, बीआरएसपीचे राजेश जाधव, बसपचे किशोर वरक, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे संजय गांगनाईक, बहुजन मुक्ती पार्टीचे भिकुराम पालकर, तसेच अपक्ष विनायक लवू राऊत, पंढरीनाथ आंबेरकर, नीलेश भातडे, नारायण गवस यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघांतील १०२७, तर सिंधुदुर्गमधील तीन विधानसभा मतदारसंघांतील ९१५ अशा एकूण १९४२ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन तासांत साधारणत: १० टक्के मतदान झाले. अकरा वाजेपर्यंत २१.५९ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३५.६९, ३ वाजेपर्यंत ४५.१०, तर पाच वाजेपर्यंत ५६.५२ टक्के मतदान झाले. साधारणत: दोन तासांत दहा टक्के मतदान झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार १४ लाख ५४ हजार ५२५ मतदार आहेत. यापैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८ लाख २२ हजार १२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदारांची संख्या ४,१०,८०० (५७.७० टक्के), तर महिला मतदारांची संख्या ४ लाख ११ हजार ३२० (५५.४० टक्के) होती. या कालावधीत एकाही तृतीयपंथी मतदाराने मतदान केले नाही.पाच वाजल्यानंतर शेवटच्या तासात काही ठिकाणी मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे पुढच्या एका तासात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.रत्नागिरी केंद्र संख्या एकूण मतदार झालेले मतदान टक्केचिपळूण ३३४ २,६९,१४० १,३८,५३७ ५१.४७रत्नागिरी ३४५ २,८०,८१९ १,६५,९७२ ५९.१०राजापूर ३३८ २,३७,८४५ १,२,१००८ ५०.८८सिंधुदुर्ग/कणकवली ३३० २,२९,५२६ १,२७,९१० ५५.७३कुडाळ २७७ २,१२,६६८ १,२९,८६६ ६०.७८सावंतवाडी ३०८ २,२३,५२६ १,३८,८२७ ६२.११एकूण १०४२ १४,५४,५२४ ८,२२,१२९ ५६.५२धोपावेत पाण्यासाठी मतदानावर बहिष्काररायगड मतदारसंघातसमाविष्ट असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील, गुहागर तालुक्यातील धोपावे येथे १३00 पैकी तब्बल ९00 मतदारांनी मतदान केले नाही.२५ वर्षे आपला पाणीप्रश्न सुटला नसल्याने या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.