शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: September 6, 2015 20:44 IST

धीरज साळे : गतवर्षीच्या तुलनेत कमी, मात्र स्थिती चांगली

वैभव साळकर - दोडामार्ग   गोवा आणि महाराष्ट्र राज्याचा मानबिंदू ठरलेल्या तिलारी धरणात यावर्षी ६४ टक्के पाणी साठा झाला आहे. आतापर्यंत धरणातील पाणी १०२.२७ मीटर एवढे वाढले असून ते २८७.१४८ द. ल. घ. मी. एवढे आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट अखेर धरणात झालेला पाणी साठा कमी आहे. मात्र स्थिती चांगली आहे. असा दावा तिलारीचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी केला आहे.महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या परिसरात पाऊस मुबलक प्रमाणात पडत असल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या परिसरातील जमिनी शेतीसाठी सोयीस्कर झाल्या असून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गोवा राज्याला तिलारी धरणातून आवश्यक पाणी मिळत असल्याने गोवा राज्यातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. तिलारी धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे गोवा राज्याला पाणी पुरवठा केला जातो. डावा व उजवा या दोन कालव्यातून पेडणे गोवा व डिचोली तालुका तसेच अस्नोडा येथे या पाण्याचे शुध्दीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दोडामार्गात आगमन केले. जलप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे तिलारी धरणातील पाण्याची पातळी विषयी विचारणा केली असता या तिलारी धरण पात्रातील गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहता सद्यस्थितीत या धरणातील पाणी १०२.२७ मीटर एवढे वाढले असून, हे पाणी जवळजवळ २८७.१४८ दशलक्षघमी एवढे असल्याचे सांगितले.तिलारी धरण सध्या चालू परिस्थितीत ६४.१८ टक्के भरलेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच या तिलारी धरणातील महालक्ष्मी जलविद्युत प्रकल्पाला ११ क्यूमी एवढे पाणी प्रत्येक दिवशी सोडण्यात येते. तसेच २०१४-१५ या वर्षीची माहिती घेतली, त्यावेळी जून, जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत २२६८.८० मिमी पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. तसेच चालू दोन महिन्यांचा कालावधी पाहता हाच पाऊस १७९१.८० मिमी झाल्याचे सांगण्यात आले. पुरेसा पाणीसाठातिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा सध्या आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा कमी आहे. याबाबत कार्यकारी अभियंता धीरज साळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पाणीसाठा पुरेसा आहे. एकदमच स्थिती काही वाईट नाही. एवढे धरण कोरडे रहावेच लागते. संपूर्ण धरण भरूनही चालत नसल्याचे साळे म्हणाले.