शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नवीन वर्षात ६०० मेगावॅट वीज

By admin | Updated: December 27, 2015 00:26 IST

रत्नागिरी गॅस : तांत्रिक मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात

संकेत गोयथळे ल्ल गुहागररत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गेला एक महिना सातत्यपूर्ण ३०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरु आहे. ही वीज रेल्वेसाठी दिली जात आहे. झारखंड व पश्चिम बंगाल राज्यांतील रेल्वेसाठी वीज पाठवण्यासंदर्भात तांत्रिक मंजुऱ्या अंतिम टप्प्यात असून, आणखी ३०० मेगावॅट वीज निर्माण करण्यात येणार असून, नवीन वर्षात ६०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होणार आहे.तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून २६ नोव्हेंबरला वीजनिर्मिती सुरु झाली. २१५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी बंद प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनेक अडचणींनंतर प्रकल्पातून सरासरी १ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सकडून होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर तयार होणारी महाग वीज घेण्यास कोणी तयार नसल्याने डिसेंबर २०१३पासून प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद होती.उर्जामंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर हालचाली सुरु झाल्या. ५०० मेगावॅट वीजनिर्मिती खरेदीला रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला. यासाठी दिल्ली येथील विशेष समितीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज घेण्यास रेल्वेला सेंट्रल इलेक्ट्रीकल रेग्युलेट्री अ‍ॅथॉरिटीचा (सीईआरसी) परवाना मिळाल्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलेट्री कमिशनची मंजुरी नोव्हेंबरमध्ये मिळाली. यानंतर महाराष्ट्र रेल्वेसाठी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आली. याचाच दुसरा टप्पा म्हणून झारखंड व पश्चिम बंगाल रेल्वेसाठी आणखी ३०० मेगावॅट वीज घेण्यासाठी रेल्वेने आवश्यक तांत्रिक प्रशासकीय मंजुऱ्या मिळणे आवश्यक होते. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने आणखी तीनशे मेगावॅट वीजनिर्मितीची भर पडून नवीन वर्षात रत्नागिरी गॅस प्रकल्पातून एकूण ६०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होणार आहे.पहिला टप्पा प्रिझर्वेशनमध्ये : तिसरा टप्पाही सुरु करण्यात येणारप्रकल्पातून तीन टप्प्यातून वीज निर्मिती होऊ शकते. सध्या टप्पा दोनमधून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून, आणखी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती करताना तिसरा टप्पाही सुरु करण्यात येणार आहे. पहिला टप्पा प्रिझर्वेशनमध्ये ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.