शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६0 टक्के कोकम वाया,,उत्पादन फुकट

By admin | Updated: September 1, 2014 00:03 IST

कोकणात सर्वाधिक उत्पादन : व्यापारी तत्वावरील लागवडीपासून दूर

मिलिंद पारकर - कणकवली -राज्यात उत्पादित होणाऱ्या कोकम फळापैकी बहुतांश कोकमचे उत्पादन रत्नागिरी, सिंधुदुर्गात होत आहे. मात्र, उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत येणाऱ्या अडचणींमुळे व्यापारी तत्त्वावरील लागवडीपासून कोकम दूरच आहे. उत्पादनापैकी फक्त ४० टक्के कोकम प्रक्रिया आदी माध्यमातून वापरात येत असून उर्वरित उत्पादन फुकट जात असल्याचे चित्र आहे. कोकम (गारसेनिया इंडिका) या प्रजातीचे उत्पादन राज्यभरात सुमारे १२,५०० मेट्रिक टन एवढे होते. त्यापैकी जवळपास ९३ टक्के उत्पादन रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत होते. म्हणजे सुमारे १० हजार मेट्रिक टन कोकम फळाचे उत्पादन फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात होते. सिंधुदुर्गात घराघरात कोकम फळापासून आमसुले, कोकम सरबत, कोकम घोल, आगुळ आदी उत्पादने घरगुती प्रक्रियेद्वारे केली जातात. कोकम किंवा रतांब्याची झाडांची लागवड ही व्यापारी तत्त्वावर केल्याचे आढळत नाही. जंगलात वाढणाऱ्या किंवा परसदारी लावलेल्या झाडांची फळे काढली जातात. काजू, आंबा फळांना जसे थेट मार्केट उपलब्ध आहे तसे कोकम फळांना नाही. कोकम फळावर प्रक्रिया किंवा अर्धप्रक्रिया करून बाजारपेठ मिळवावी लागते. त्यामुळे लागवड करण्यात शेतकरी उदासीन आहेत. असलेल्या झाडांवरून फळे मिळवून काही प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे. मात्र, कोकम लागवडीपासून मार्केटींगपर्यंत सुनियोजीत साखळी निर्माण न झाल्याने एकंदर कोकम उद्योग ऊर्जितावस्थेला आलेला दिसत नाही.कोकम फळापासून कोकम घोल, आमसुले, कोकम सरबत, कोकम आगळ, बियांपासून मुठियाल या पारंपरिक उत्पादनांबरोबर रेडी टू सर्व्ह ड्रिंक, कार्बोनेटेड कोकम सरबत, हायड्रॉक्सिसायट्रिक अ‍ॅसिड, कोकम एक्स्ट्रॅक्ट, कॉसंट्रेट आदी व्यापारी उत्पादनेही घेतली जातात. त्यामुळे या पिकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.कोकमच्या झाडांची लागवड झाल्यानंतर १५-२० वर्षानंतर फलधारणा होते. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यास उदासीन वातावरण आहे. कोकम झाडांना फलधारणा पावसाळ्याच्या तोंडावर होणे ही मोठी समस्या आहे. पावसात होणारी फळ धारणा आणि उंच झाडांची फळे गोळा करणे अडचणीचे ठरते. पावसामुळे फळांचे नुकसान होते. गार्सेनिया इंडिका प्रजाती लुप्त होण्याची भीती---------------------------द४ं१‘ढ१ी२२ (३े)---------------------------उंल्लह्ण३ ६१्र३ी ३ङ्म ्िर२‘. [-61]---------------------------डङ ---------------------------सिंधुदुर्गात आतापर्यंत कोकम प्रक्रिया उद्योगाला बळकटी देण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. काही उद्योजकांकडून अर्धप्रक्रिया केलेले कोकम मॅप्रो, योजकसारख्या कंपन्यांकडून घेतले जाते. कोकम सरबत टेट्रापॅकमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. आता जिल्ह्यातील कोकमवर प्रक्रिया करणाऱ्या ४० उद्योजकांच्या सहभागातून कोकम क्लस्टर करण्यात आले आहे. लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यातून हा सुमारे १५ कोटींचा प्रकल्प साकारण्यात येत आहे.- डॉ. आनंद तेंडूलकर,कणकवली