शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यासाठी ५.८३ कोटींचा निधी

By admin | Updated: August 13, 2014 23:40 IST

मैथिली तेली : जिल्हा नियोजनमधील विकासकामांची माहिती

कणकवली : कणकवली तालुक्यासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी ८३ लाख १३ हजार रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. विकासकामांसाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती सभापती मैथिली तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती बबन हळदिवे उपस्थित होते.डोंगरी विकासअंतर्गत रस्ते दुरूस्तीसाठी ७७ लाख ५० हजार रूपये, ग्रामीण तीर्थक्षेत्र क वर्ग अंतर्गत यात्रास्थळ विकासासाठी ५५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण मार्गांसाठी १ कोटी १० लाख ५० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. पूरहानीअंतर्गत १ कोटी ९० लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये साकव दुरूस्ती, संरक्षण भिंंत बांधणे व दुरूस्ती, मोरी, कॉजवे दुरूस्ती या कामांचा समावेश आहे. साकव दुरूस्तीसाठी ३४ लाख २० हजार रूपये, धावपट्टी सुधारणा ९६.३५ लाख, संरक्षण भिंत दुरूस्तीसाठी २ लाख, संरक्षण भिंंत बांधकामासाठी २५.९० लाख, मोरी दुरूस्तीसाठी ९ लाख ३५ हजार, कॉजवे दुरूस्तीसाठी ३.२५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नागरी सुविधाअंतर्गत कामांसाठी २८.१० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जनसुविधा कामांसाठी ८० लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर रस्ते व पूल दुरूस्तीसाठी ४२.०३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. असा एकूण ५ कोटी ८३ लाख १३ हजार रूपयांचा निधी २०१४-१५ या वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. कामांचे प्रस्ताव यापुढे सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. ग्रामीण तीर्थक्षेत्र क वर्ग यात्रास्थळांच्या विकासाअंतर्गत पियाळी स्वयंभू मंदिर सुशोभिकरण, आशिये दत्तमंदिर रस्ता सुधारणा, भिरवंडे गणपती मंदिर ते रामेश्वर मंदिर रस्ता, वारगांव-कोळंबा मंदिर सुशोभिकरण, भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे पार्किंग व गटार या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रूपये आणि कळसुली गिरोबा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी ५ लाख रूपये अशी कामे घेण्यात आली आहेत. जनसुविधाअंतर्गत तळेरे, दारिस्ते, दारूम ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती उभारणीसाठी प्रत्येकी १० लाख रूपये तर सांगवे, नरडवे, बोर्डवे स्मशानभूमी शेडसाठी प्रत्येकी ३ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)