शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

५७७ अंगणवाडी केंद्रे हक्काच्या इमारतीविना

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

१0८ ठिकाणी भाड्याच्या घरात : जिल्ह्यात प्राथमिक शाळा, समाजमंदिराच्या आधारे चालते विद्यार्जन

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी  लहानपणापासूनच बालमनावर सुसंस्कार घडावेत यासाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात अंगणवाडी केंद्र सुरु आहेत. मात्र, ज्या अंगणवाडी केंद्रातून सुसंस्काराचे धडे दिले जातात, त्याच अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारत नसल्याने बालकांना विद्यार्जनासाठी अडचणी येत आहेत. अनेक गावात अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खोलीत चालविले जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ५७७ अंगणवाडी केंद्रांना हक्काची व स्वतंत्र इमारत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग चिमुकल्यांना हक्काची इमारत बांधून देण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.लहानपणापासून बालमनावर सुसंस्कार घडावे यासाठी अंगणवाडी केंद्र चालविले जातात. अंगणवाडी केंद्रातून सुसंस्काराबरोबरच मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण व सकस आहार दिला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२४३ नियमित अंगणवाड्या तर ३२७ मिनी अंगणवाड्या अशी एकूण १५७० अंगणवाडी केंद्रे आहेत. यातील ३१३ अंगणवाड्या या प्राथमिक शाळेतील इमारतीचा आधार घेऊन सुरु आहेत. ९७ अंगणवाडी केंद्रे ही समाजमंदिरात तर १६७ अंगणवाड्या या खासगी इमारतीमध्ये आहेत. असे एकूण ५७७ ठिकाणी अंगणवाडी केंद्रांची स्वतंत्र इमारत नसल्याचे समोर आले आहे. ३१३ अंगणवाड्या या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये सुरु आहेत. त्यामुळे जेथे शिक्षणाचा खरा पाया सुरू होतो त्याकडेच दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.समाज मंदिराचा आधार : १0८ अंगणवाड्या मोजतात अडीच लाख भाडेजिल्ह्यातील ९७ अंगणवाडी केंद्रे ही समाजमंदिरामध्ये सुरु आहेत. लहान मुलांना अ, आ, इ चे धडे घेता यावेत यासाठी गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती अंगणवाडी केंद्र चालविण्यासाठी जागा देतात. १६७ अंगणवाड्या या खासगी इमारतीमध्ये आहेत. यातील ५९ इमारतींमध्ये संबंधित मालकाने मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्याचे भाडे आकारण्यात येत नाही. मात्र, उर्वरित १०८ अंगणवाडी केंद्रांना सरासरी २०० रुपयांच्या मानाने वर्षाकाठी सुमारे अडीच लाख रुपये भाडे द्यावे लागत आहे.नाबार्ड मार्फत अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामासाठी १00 टक्के अनुदान दिले जाते. मात्र, यापूर्वी साडेचार लाख रूपये कंत्राटदारांना दिले जात होते. त्यात दीड लाखाची भर घालण्यात आली. जी कामे अर्धवट स्थितीत आहेत त्यांना हे वाढीव अनुदान मिळालेले नसल्यामुळे ही ३६ अंगणवाडी केंद्रांची कामे ही अर्धवट स्थितीत आहेत. यापूर्वी ४७ ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठीचे प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त आहेत. मात्र त्यांना मंजुरी मिळाली नसल्याचे समजते.जागा शोधून देण्यास सदस्यांना अपयश१५७० अंगणवाड्यांपैकी ५७७ अंगणवाडी केंद्रांना जागाच उपलब्ध (स्वतंत्र इमारत) नाही ही निश्चित धक्कादायक बाब आहे. महिला व बालविकास समितीच्या मासिक सभेमध्ये अंगणवाड्यांच्या इमारतीचा एकदाही विषय काढला जात नाही. एरव्ही विविध योजनांवर, निधीवर तासनतास बोलणारे समिती सदस्य मात्र अंगणवाडी केंद्राच्या स्वतंत्र इमारतीसाठी साधे बोलतानाही निदर्शनास येत नाही. अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून न देणे म्हणजे या समिती सदस्यांचे अपयशच मानावे लागेल. अंगणवाडी केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून निधी मिळत असला तरी अनेक ठिकाणी बांधकामासाठी जागाच उपलब्ध नसल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त असणाऱ्या वर्गखोलीचा वापर अंगणवाडी केंद्रांना देण्यात आल्याचे दिसून येत आहे. जागा शोधून देण्यास सदस्यांना अपयश१५७० अंगणवाड्यांपैकी ५७७ अंगणवाडी केंद्रांना जागाच उपलब्ध (स्वतंत्र इमारत) नाही ही निश्चित धक्कादायक बाब आहे. महिला व बालविकास समितीच्या मासिक सभेमध्ये अंगणवाड्यांच्या इमारतीचा एकदाही विषय काढला जात नाही. एरव्ही विविध योजनांवर, निधीवर तासनतास बोलणारे समिती सदस्य मात्र अंगणवाडी केंद्राच्या स्वतंत्र इमारतीसाठी साधे बोलतानाही निदर्शनास येत नाही. अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून न देणे म्हणजे या समिती सदस्यांचे अपयशच मानावे लागेल. अंगणवाडी केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून निधी मिळत असला तरी अनेक ठिकाणी बांधकामासाठी जागाच उपलब्ध नसल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त असणाऱ्या वर्गखोलीचा वापर अंगणवाडी केंद्रांना देण्यात आल्याचे दिसून येत आहे.