शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

संकष्ट चतुर्थीला ५४२१ मोदकांचा नैवेद्य

By admin | Updated: September 20, 2016 23:47 IST

२१ दिवसांचा गणेशोत्सव : सावंतवाडीतील हनुमान मंदिरातील उपक्रम

सावंतवाडी : वैश्यवाडा-सावंतवाडी येथील श्री देव हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सोमवारी गणरायांना सुमारे ५४२१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.२१ दिवसांचा गणेशोत्सव असलेल्या या उत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून, ते धोंडी दळवी, अ‍ॅड. परिमल नाईक, प्रकाश मिशाळ, शरद सुकी, वैश्यवाडा महिला मंडळ, प्रकाश सुकी, नीलेश नार्वेकर, म्हापसेकर बंधू, महादेव गावडे यांच्याकडून होत आहे. पुंडलिक दळवी, डॉ. गोविंद केसरकर यांच्या सहकार्यातून दररोजचे कार्यक्रम होत आहेत.संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे येथील वेदपाठशाळेचे प्राचार्य दीक्षित गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. यात बहुसंख्य महिला, नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी महाआरती व सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. २५ सप्टेंबरला भव्यदिव्य अशा विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी हलते देखावे, ढोलपथक, फुगडी नृत्य तसेच वैश्यवाडा भागातील कलाकारांच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या गणेशोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन हनुमान मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष शरद सुकी यांनी केले आहे. (वार्ताहर)