शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटी

By admin | Updated: May 4, 2015 00:38 IST

विनायक राऊत यांचा विश्वास

अडरे : केंद्र शासनाने मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटीची तरतूद केल्यामुळे हा महामार्ग कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राज्यमार्ग बनेल, असा विश्वास रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. चिपळूण शहरातील मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार राऊत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार बाळ माने, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, कळंबस्तेचे सरपंच अरुण भुवड, उपसरपंच भाऊ मोरे, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, महिला जिल्हा संघटक दर्शना महाडिक, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले की, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून कोकणवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे कोकणातील रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. चौपदरीकरणाबाबत काही अडचणी आल्यास त्या आम्हाला सांगा, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते म्हणाले की, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून रस्ते विकासाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. ३ लाख कोटीचा निधी रस्ते विकासासाठी खर्च होणार आहे. रस्ते काँक्रीटीकरण केले जाणार आहेत. बहादूरशेख नाका ते पाग नाका या दरम्यान उड्डाण पूल व्हावा, अशी शहरवासीयांची मागणी असून, चार महिन्यांपूर्वीच याबाबतचा निर्णय आपण घेतला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेला जसे सहकार्य केले त्याचप्रमाणे रस्ता चौपदरीकरणासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)