शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘रत्नागिरी गॅस’मधून आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती

By admin | Updated: January 23, 2016 23:49 IST

रेल्वेकडून वीज खरेदी : झारखंड, पश्चिम बंगाललाही वीजपुरवठा

गुहागर : रत्नागिरी गॅस प्रकल्पातून गेले दोन महिने ३०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने सुरू आहे. त्यानंतर आता झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता रेल्वेने केली आहे. त्यामुळे २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून वीजनिर्मितीत २०० मेगावॅटची वाढ होऊन आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस प्रकल्पातून २६ नोव्हेंबरला वीजनिर्मिती सुरू झाली. २१५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी बंद प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनेक संकटांवर मात करून प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सकडून होणाऱ्या गॅसपुरवठ्यावर तयार होणारी महागडी वीज घेण्यास कोणीही तयार नसल्याने डिसेंबर २०१३ पासून प्रकल्पातील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद होती. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पहिल्यांदा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरूकरणार, अशी घोषणा केली आणि त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ५०० मेगावॅट वीजनिर्मिती खरेदीला रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला. यासाठी दिल्ली येथील विशेष समितीने प्रकल्पाला भेट दिली. रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज घेण्यास सेंट्रल इलेक्ट्रिकल रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (सीईआरए) परवाना मिळाल्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनची नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली. यानंतर महाराष्ट्र रेल्वेसाठी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती टप्पा-३ मधून सुरू करण्यात आली. झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासाठी रेल्वेला परवाना मिळणे आवश्यक असल्याने गेले दोन महिने या तांत्रिक मंजुरी मिळविण्यात गेले. याबाबत रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडे आदेश प्राप्त झाल्यानंतर २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून टप्पा-२ (बी)मधून २०० मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात झाली. आता या प्रकल्पातून ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.