शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

जिल्ह्यात साडेपाच लाख रेशन कार्डांना ‘आधार’

By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST

संगणकीकरण प्रकल्प : पुरवठा विभागाची विशेष मोहीम

रत्नागिरी : शासनाच्या रेशनकार्ड संगणकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याच्या कामाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, आतापर्यंत ५,६७,८३० लाभार्थींचे ‘लिंकिंग’ करण्यात आले आहे.रेशनकार्ड संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रेशनकार्डला आधारकार्ड जोडण्याच्या कामाला जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, रेशन दुकानांमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले होते. सुरुवातीला बहुतांश नागरिकांची आधारकार्ड नसल्याने या प्रक्रियेत अडचणी येत होत्या.जिल्हा प्रशासनाकडून यासाठी ठराविक मुदत दिल्यानंतर ज्यांनी आधारकार्ड काढली नव्हती, त्यांची धावपळ सुरू झाली होती. आधारकार्डसाठीही विशेष मोहीम राबविण्यात आल्याने बहुतांश आधारनोंदणी झाली आहे. त्यापैकी ज्यांना आधारक्रमांक (युआयडी) मिळाले आहेत, अशांकडून ही माहिती भरून घेण्यात आली असून, संगणकामध्येही ती भरण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३,७४,३९७ शिधापत्रिकाधारक असून, एकूण लाभार्थी संख्या १७,०८,५१९ इतकी आहे. या लाभार्थींपैकी ५,६७,८३० लाभार्थींचे आधारकार्ड रेशनकार्डशी लिंकिंग करण्यात आले आहे. त्यांची संपूर्ण माहिती संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. आता या कामाने वेग घेतला आहे.लवकरच उर्वरित लाभार्थींची आधारकार्डही जोडली जातील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)मोहिमेच्या सुरूवातीला या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून भरून घ्यावयाचे रेशनदुकानदारांकडे ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच कालावधीत रेशनदुकानदारांचा संप सुरू झाल्याने त्यांनी आपण ग्राहकांना अर्ज देऊ मात्र, भरलेले अर्ज परत घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे या मोहिमेत अडचण निर्माण झाली होती.रेशनदुकानदारांनी भरलेले अर्ज संकलित करण्यास नकार दिल्याने प्रत्येक तहसील कार्यालयाकडून ही जबाबदार तलाठी व आशा वर्कर, पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्याकडून हे अर्ज संकलित करून ते पुरवठा विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. अनेक ग्राहकांनी आधारकार्ड काढून कित्येक महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना आधारकार्ड मिळालेली नाहीत. तसेच आॅनलाईन प्रक्रियेत अडथळा येत असल्याने काहींना युआयडी क्रमांकही मिळालेला नाही. त्यामुळे कामाचा वेग मंदावत आहे. मात्र येत्या काही दिवसात हे कामही गती घेईल आणि जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थींची आधारकार्ड जोडली जातील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील एकूण लाभार्थी संख्या,युआयडी संलग्न संख्या तालुकालाभार्थी युआयडी संख्यासंख्यामंडणगड७३८५०१९०१७ दापोली१९५३०७७२५५१ खेड१८७३०५६८२९९ चिपळूण२८६५७६७४९६३ गुहागर१३२०१७३११२८ संगमेश्वर२२५३४६९१४३४ रत्नागिरी३१०४३२१२२२७३ लांजा१११९०७४७७७५ राजापूर१८५७७९४०३९०एकूण१७०८५१९५६७८३०