शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे यांच्यासह ४0 जणांना सशर्त जामीन मंजूर

By admin | Updated: March 10, 2016 23:56 IST

डंपर आंदोलन प्रकरण : शासकीय मालमत्तेचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह ४० संशयित आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. हुद्दार यांनी सशर्त जामीन मंजूर केला. डंपर चालक-मालक यांच्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून येथील शासकीय मालमत्तेचे नुकसान व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शनिवारी (दि. ५) आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, दत्ता सामंत यांच्यासह एकूण ४० आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३३२, ३५३, ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ६ मार्चला यातील काही व त्यानंतर काहीजणांना कणकवली न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.१० मार्चला ही मुदत संपल्याने त्यांना ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. न्यायालयीन कोठडी मिळताच संबंधित संशयितआरोपींनी वकिलांमार्फत न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला. यावरील सुनावणीत सर्व आरोपींना प्रत्येकी ७ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. तसेच दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आठजणांच्या ग्रुपने आठवड्यातून एक दिवस ओरोस पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये, तपासकामात पोलिसांना मदत करावी आदी अटीही घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, आमदार नीतेश राणे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.जामीन झालेल्यांमध्ये आमदार नीतेश राणे, सतीश सावंत, संग्राम प्रभुगावकर, संतोष कोदे, नजीर शेख, राधाकृष्ण पावसकर, अनिल नाईक, राजेश सावंत, दुर्गाप्रसाद स्वामी, योगेश राऊळ, शोहेब शेख, अनंत मेस्त्री, स्वप्निल मिठबांवकर, प्रदीप मांजरेकर, संतोष धुरी, महेश म्हाडदळकर, रमेश वायंगणकर, संजय पालव, चंदन कांबळी, अक्षय सावंत, मिलिंद मेस्त्री, देवदत्त सामंत, राकेश म्हाडदळकर, रुपेश जाधव, मुकुंद परब, राकेश परब, एकनाथ नाडकर्णी, संतोष नालंग, सिद्धेश परब, पंढरीनाथ हडकर, महेंद्र सांगेलकर, संतोष चव्हाण, हनुमंत बोंद्रे, आनंद भोगले, यशवंत सावंत, सुनील पवार, सुशांत पांगम, अनिल कांदळकर यांना अटक करण्यात आली होती, तर शिवा सोनू परब व संतोष सोमा राऊत यांना रुग्णालयात दाखल केले गेले असल्यामुळे त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यापैकी १ ते १० जणांसाठी अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्यासह अ‍ॅड. आनंद गवंडे व अ‍ॅड. अविनाश परब, ११ ते २३ यांच्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, २४ ते ४० यांच्यासाठी अमोल सामंत यांनी काम पाहिले. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सकाळपासूनच न्यायालयाच्या बाहेर काँग्रेस समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.संशयितांच्यावतीने अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. अमोल सामंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)