शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

३९ हजार ६00 लिटर स्पिरीटचा लिलाव

By admin | Updated: June 13, 2015 00:19 IST

बांदा पोलीस ठाणे आवारात प्रक्रिया : पोलिसांनी कारवाईत केले होते जप्त

बांदा : बांदा पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेल्या तीन स्पिरीटच्या टँकरची शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. तिन्ही टँकरमधील सुमारे ३९ हजार ६०० लिटर स्पिरीट हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील मे. सर्वोत्तम ऊर्जा प्रा. लि. कंपनीचे दीपक माणिकराव पाटील यांनी सर्वाधिक बोली लावून विकत घेतले.गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा स्पिरीटची वाहतुक करताना बांदा पोलिसांनी तिन स्पिरीटच्या टँकरवर कारवाई केली होती. हे स्पिरीटचे टँकर बांदा पोलिस स्थानक आवारात कोणत्याही सुरक्षेविना ठेवण्यात आले होते. या स्पिरीटच्या टँकरचा लिलाव करावा अशी मागणी होत होती. बांदा पोलिसांनी विविध कारवाईत १५ हजार ६०० लिटर, १४ हजार लिटर व १0 हजार लिटर अशा तीन स्पिरीटच्या बेकायदा टँकरवर कारवाई केली होती.बांदा पोलिसांनी याबाबत ९ फेबु्रवारी २०१२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाबाबत लेखी पत्र दिले. जिल्हाधिकारी यांनी ७ मे २०१५ रोजी या स्पिरीटचा लिलाव करण्याचा आदेश दिला. लिलावाची प्रक्रिया राबविण्यासाठी बांदा पोलिसांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला पत्र दिले. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करुन शुक्रवारी लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली.स्पिरीटच्या खरेदीसाठी ४ लिलावधारकांनी अर्ज केला होता. मात्र आज प्रत्यक्षात तीन लिलावधारक हजर होते. मे. ओयलिस अल्कोहोल प्रा. लि. तासवडे, कराड यांच्यावतीने महेश धोंडीराज भोसले, मे. श्रीराम ट्रेनिंग अ‍ॅण्ड मॅन्युफ्कॅचरिंग कंपनी लिमिटेड हातकणंगले, कोल्हापूर यांच्यावतीने अभिजीत मोहनराव पाटिल व मे. सवौत्तम ऊर्जा प्रा. लि. हातकणंगले, कोल्हापूर यांच्यावतीने दीपक माणिकराव पाटील यांनी लिलाव प्र्रक्रियेत भाग घेतला.प्रति लिटर १८ रुपये दराने बोलीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिपक पाटील यांनी २२ रुपये ५० पैसे प्रति लिटर बोली लावली. ही बोली सर्वाधिक ठरली. यावेळी दीपक पाटील यांचेकडून २५ हजार रुपये अनामत रक्कम भरुन घेण्यात आली. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष स्पिरीटचा साठा किती आहे याची मोजणी करुन स्पिरीटची विक्रि करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी सांगितले. यावेळी उपअधीक्षक अनंत आरोसकर, उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुली तपासणी नाक्याचे दुय्यम निरिक्षक अमित पाडाळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)