शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

३९ प्रवाशांना जीवदान देणाऱ्या चालकाचा गौरव

By admin | Updated: August 20, 2016 00:21 IST

एसटीतर्फे सन्मानित : प्रसंगावधान राखून केलेल्या कार्याची वरिष्ठ पातळीवरून दखल

सावंतवाडी : ३९ प्रवाशांना जीवदान देणारे सावंतवाडी आगाराचे एस.टी. बसचालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागामार्फत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन जिल्ह्याचे विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.बसचालक हा एस.टी.चा मुख्य घटक असतो. चालकाच्या अंगी असणाऱ्यासर्व योग्य गुणांच्या आधारावर बसचा प्रवास सुरू असतो. असाच प्रवास सुरू असताना ३ जुलै रोजी चालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांनी थरारक प्रसंग अनुभवला. तुळसकर यांनी प्रसंगावधान राखून ३९ प्रवाशांचे प्राण वाचविले होते. सावंतवाडी आगारातील चालक बाबली तुळसकर व वाहक गुरुनाथ पिळणकर हे ३ जुलै रोजी नियोजित ड्युटी दोडामार्ग ते मांगेली मार्गावर जात होते. दरम्यान, वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे वीज तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. यावेळी अचानक वीज तारा बसवर कोसळल्याने विजेचा सौम्य धक्का चालक तुळसकर यांना बसला. मात्र, अशा कठीण परिस्थितीही न डगमगता या विद्युत प्रवाहाच्या तारापासून सुरक्षित बस नेत बसमधील ३९ प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचविले होते. या घटनेची दखल वरीष्ठ पातळीवरून घेत त्यांना गौरविण्यात आले. तुळसकर यांच्या धैर्यवान कर्तृत्वाने विविध सामाजिक स्तरावर विशेष कौतुक होत आहे. (वार्ताहर)