शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३६३ धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे

By admin | Updated: June 3, 2016 00:44 IST

जिल्हा परिषद शाळांना कोणी वालीच नाही : दुरूस्तीचा अहवाल ३ वर्षांपासून पडून, मंजुरी मिळूनही निधीअभावी एकही शाळेची दुरूस्ती नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या शाळांना कोणी वालीच उरला नसल्याचे आजच्या सभेत उघड झाले. गेल्या तीन वर्षांपासून तब्बल ३६३ शाळांची दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचे अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर पाठविण्यात आला. त्यातील शाळांना दुरुस्तीसाठी मंजुरीही मिळाली. मात्र निधीअभावी यातील एकाही शाळेची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या शाळांमध्ये मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा प्रकार समोर आला आहे.जिल्हा परिषद शिक्षण समितीची खास सभा सभापती आत्माराम पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य विष्णू घाडी, स्वीकृत सदस्य संजय बगळे, संतोष पाताडे, फादर लोबो, समिती सचिव तसेच शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा या दुरुस्तीच्या गर्तेत सापडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून २२७ शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र निधीअभावी यातील एकही काम सुरु होऊ शकलेले नाही. तर यावर्षी नव्याने १३६ शाळा दुुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी दिली. गेली तीन वर्षे मुलांना त्या धोकादायक शाळांमधून शिक्षण घ्यावे लागत असून एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शाळांच्या या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना याच धोकादायक ३६३ शाळांमधून शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत. आता पावसाळा सुरू होत असून यासर्व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून अभ्यास करावा लागणार आहे. (प्रतिनिधी) १४८0 संगणक : ८४२ सुस्थितीत, ६३८ बंदावस्थेतजिल्हा परिषद शाळांमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे घेता यावे यासाठी सर्व शिक्षा अभियानामधून २००३ मध्ये १४८० संगणक शाळांना पुरविण्यात आले होते. ही निश्चितच कौतुकाची बाब होती. मात्र सद्यस्थिती पाहता यातील ८४२ संगणक सुस्थितीत असून ६३८ संगणक बंदावस्थेत आहेत. या संगणकांचा मदरबोर्ड, हार्डडिस्क खराब असल्याने व त्यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने हे संगणक बंदावस्थेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी दिली.