शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

३४ लाखांचे अर्थसहाय्य

By admin | Updated: September 20, 2015 23:41 IST

२२५ अपंगांना वाटप : अंकुश जाधव यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील २२५ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे ३३ लाख ७५ हजार एवढे व्यवसायासाठी अर्थसहाय्य पुरविण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली.समाजकल्याण विभागामार्फत सर्व जाती धर्मांच्या अपंग लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये अपंगाना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, मोफत झेरॉक्स मशिन पुरविणे, बीज भांडवल योजना, अस्थीव्यंग मुलांना वसतीगृहाची मोफत सुविधा, अपंग दाम्पत्याला अर्थसहाय्य याही योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त अपंग लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहनही सभापती अंकुश जाधव यांनी केले आहे.अपंगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याची तरतूद या योजनांमध्ये असून प्रत्येक लाभार्थ्याला १५ हजारांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी जिल्हा परिषद अनुदानातून १५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना सर्व जाती धर्मांच्या अपंग बांधवांसाठी खुली असून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील २२५ लाभार्थ्यांना ३३ लाख ७५ हजार एवढे अर्थसहाय्य करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न ४० हजार पेक्षा कमी असावे, तसेच लाभार्थी ४० टक्केहून जादा अपंगत्व असणे आवश्यक आहे. व्यवसाय करत असल्याबाबतचा सरपंच किंवा ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक आहे. स्वयंरोजगारासाठी अपंगाना १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशिन पुरविणे या योजनेसाठी जिल्हा परिषद निधीतून २० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्याकडे व्यवसायासाठी विजेची सोय असलेली जागा उपलब्ध असावी.बीज भांडवल योजनेंतर्गत अपंगांना अर्थसहाय्य पुरविण्यात येत असून ४० टक्के पेक्षा जादा अपंगत्व असलेल्या १८ ते ५० वयोगटातील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. १ लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अपंग व्यक्तींना व्यवसायाचा आराखडा दिल्यानुसार प्रकल्प खर्चाच्या २० टक्के किंवा ३० हजारपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.कर्णबधीर, मुखबधीर विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निवासी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिरोज येथील माऊली कर्णबधीर विद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.तरी जिल्ह्यातील अपंग बांधव तसेच विद्यार्थ्यांनी जिल्हापरिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी या विभागाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोयअंध मुलांसाठी कुडाळ एम. आय. डी. सी येथील शासकीय अंधशाळेत मोफत शिक्षण देण्यात येते. तसेच त्याच ठिकाणी अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना निवासाची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे, अशीही माहीती अंकुश जाधव यांनी दिली.