शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

३२ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: December 17, 2014 22:53 IST

वेंगुर्ले पंचायत समिती सभा : दीपक केसरकरांच्या अभिनंदनाचा ठराव

वेंगुर्ले : वेंगुर्ले पंचायत समितीच्या सन २०१४-१५ च्या ३२ लाख रुपयांच्या सुधारीत अंदाजपत्रकास आणि सन २०१५-१६ च्या २० लाखाच्या मूळ अंदाजपत्रकास पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली. वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी उपसभापती स्वप्निल चमणकर, पंचायत समिती सदस्या चित्रा कनयाळकर, उमा मठकर, सुनील मोरजकर, अभिषेक चमणकर, प्रणाली बंगे, सावरी गावडे, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी, बाबली वायंगणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी सामंत तसेच सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला आमदार दीपक केसरकर यांची ग्रामीण व वित्त राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. सन २०१४-१५ च्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये इमारत व दळणवळणासाठी १ लाख, शिक्षक व क्रीडा २ लाख, कृषी विभाग ५ लाख ५० हजार, पशुसंवर्धन ५० हजार, समाजकल्याण ६ लाख २१ हजार, महिला व बालकल्याण २ लाख ७० हजार, संकीर्णमध्ये ६ लाख ८४ हजार, आरोग्य व टोकण खर्च २५ हजार, भांडवली खर्च ४ लाख ५० हजार व महसुली शिल्लक ५० हजार असे एकूण ३२ लाखांमध्ये विभाजन करण्यात आले. सन २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये शिक्षण व क्रीडा १ लाख, दळणवळणासाठी ३ लाख, आरोग्यासाठी ५ लाख, कृषी विभागासाठी ५ लाख, समाजकल्याण व अपंग कल्याणासाठी ४ लाख १४ हजार, संकीर्णमध्ये २ लाख, महिला व बालकल्याण १८ हजार, महसुली खर्च १ लाख ७५ हजार, भांडवली खर्च २ लाख असे एकूण १९ लाख ५० हजारांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. तालुक्यात काही शाळांमध्ये शिक्षक जास्त आहेत, काही शाळांमध्ये कमी आहेत. जास्त असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांंची बदली आवश्यक असलेल्या शाळांमध्ये करावी, असे पुरुषोत्तम परब यांनी सांगितले. तसेच या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नष्ट झालेल्या घरांच्या सर्व्हेचे आदेशनुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा व काजू शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजाराची तत्काळ आर्थिक मदत मिळावी, असा प्रस्ताव माजी सभापती अभिषेक चमणकर यांनी ठेवला. उभादांडा ग्रामपंचायतीमध्ये जी घरे नष्ट झाली आहेत, अशा घरक्रमांकांची घरपट्टी आकारली जात आहे. पंचायत समितीने संंबंधित विभागाला अशा नष्ट झालेल्या घरांचा सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत, असेही चमणकर यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर यांनी आसोली गावातील वीज वारंवार खंडीत होत असल्याचे यावेळी उपस्थित असलेल्या वीज विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.