शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

३१३० मतदान यंत्र, ११ हजार कर्मचारी

By admin | Updated: February 20, 2017 23:54 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

रत्नागिरी : परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणांसाठी उद्या २१ रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यातील एकूण १५६५ मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ३१३० इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांसह ११,१०९ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर आज (सोमवारी) रवाना झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार (दि. २१) रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हाभरात एकूण १० लाख ७१ हजार ८१५ इतके मतदार आहेत. त्यापैकी पुरूष ५ लाख ९४ हजार १०, तर महिला मतदारांची संख्या ५ लाख ६२ हजार ३९८ इतकी आहे. यासाठी १५६५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशी प्रत्येकी दोन मतदान यंत्र वापरावी लागणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्राच्या दुप्पट ३१३० इतकी यंत्र लागणार आहेत. यंदा प्रथमच निवडणुकीसाठी दोन स्वतंत्र मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत.तसेच एखाद्या यंत्रांमध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास पर्यायी १० टक्के मतदानयंत्र तयार ठेवावी लागणार आहेत. उद्या मतदान होणार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस असे सहा कर्मचारी आज सकाळी आपापल्या केंद्रावर मतदानयंत्रासह दाखल झाले आहेत.यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १४२ गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येकी १० मतदान केंद्रासाठी एक असे १६६ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी आणि अधिकारी सोमवारी सकाळी त्या त्या मतदान केंद्रावर रवाना झाले. जिल्ह्यात सर्व एस. टी. दुपारपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचल्या.उद्या मंगळवारी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. गुरूवार, २३ रोजी सकाळी मतमोजणी हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)