शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: May 23, 2015 00:34 IST

मजूर सहकारी संस्थेसाठी आज निवडणूक, सायंकाळी मतमोजणी

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील मजूर सहकार संस्थांच्या संघ फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी होत असून मजूर संघाच्या १३ जागांसाठी एकूण २६ उमेदवार आपले भवितव्य अजमावणार आहेत. सकाळी ८ ते ४ या वेळेत माध्यमिक पतपेढी ओरोस येथे मतदान होणार आहे तर तेथेच ५ वाजता मतमोजणी होणार आहे.मजूर सहकार संघाची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी होत असून विद्यमान अध्यक्ष बाबा आंगणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत श्रमसंकल्प पॅनल आणि सर्वपक्षीय समावेश असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली मजूर वैभव पॅनल यामध्ये ही दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.या निवडणुकीसाठी १३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये कणकवली ३०, कुडाळ २५, मालवण २३, सावंतवाडी २०, वैभववाडी १४, वेंगुर्ला १३, देवगड ९ आणि दोडामार्ग तालुक्यात ५ संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर २६ उमेदवारांचे भवितव्य सिलबंद करणार आहेत.महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी साक्षी हेमंत बागवे आणि श्रद्धा विलास गावकर (काँग्रेस आघाडी), रक्षदा राजेंद्र सावंत आणि रसिका राजन धुरी (मजूर वैभव), इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी रंजन बाळकृष्ण चिके (मजूर वैभव) आणि केशव बाबुराव बेळणेकर (काँग्रेस आघाडी) यांच्यामध्ये लढत आहे. भटक्या विमुक्त जमातीतील एका जागेसाठी प्रकाश रामचंद्र पवार (मजूर वैभव) आणि रामचंद्र जनार्दन जंगले (काँग्रेस आघाडी) यांच्यात लढत आहे. अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी आत्माराम सोमा ओटवणेकर (काँग्रेस आघाडी) आणि दत्ताराम राजाराम कसालकर (मजूर वैभव) यांच्यात लढत होणार आहे.खुल्या प्रवर्गातील ८ जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून काँग्रेस आघाडीतर्फे लक्ष्मण आंगणे, अनिल गोपाळ गडकर, गजानन गावडे, रघुनाथ वसंत गावडे, संतोष मनोहर परब, सुनील रामचंद्र भोगले, श्रीकांत चंद्रकांत राणे, संदीप रमाकांत सावंत हे निवडणूक लढवत आहेत. तर मजूर सहकार वैभव पॅनलतर्फे संभाजी साटम, दत्ताराम पेडणेकर, अच्युत गावडे, आत्माराम बळीराम बालम, राजाराम हरिश्चंद्र पालव, अरूण गुणाजी सावंत, तुळशीदास रावराणे, प्रशांत नामदेव सावंत हे लढत देत आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे तर चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपताच तासाभरात त्याच ठिकाणी व त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्रया निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार तर दुसरीकडे नाराज सदस्यांनी विरोधकांच्या साथीने तयार केलेले मजूर वैभवचे उमेदवार अशी दुरंगी लढत होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. तर निवडणूक निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.