शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ससीन’बंदीमुळे २५ हजार कुटुंबियांची उपासमार

By admin | Updated: March 8, 2016 00:34 IST

बंदीचा परिणाम : बारा हजार खलाशीही बेकार होणार

रहिम दलाल-- रत्नागिरी  शहरातील पर्ससीन नेट मासेमारीवर शासनाकडून बंदी घालण्यात आल्याने सुमारे १२ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ हजार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे माजी संचालक व मच्छीमार नेते नूरमहंमद सुवर्णदुर्गकर यांनी दिली. महाराष्ट्र सागरी अधिनियम १९८१ अंतर्गत पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश येऊन आज महिना उलटला. त्यामुळे या व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असलंबून असलेल्या इतर व्यवसायांवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पर्ससीन मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आल्याने यावर अवलंबून अन्य व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली असल्याचे सुवर्णदुर्गकर यांनी सांगितले. बहुतांश पर्ससीन मच्छीमारांनी नौकांसाठी बँकाकडून, खासगी वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जर का परवाने कमी केले अगर यापुढे मासेमारी बंद केली तर मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत. पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी ही फक्त सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत करण्याचे दिलेले आदेश मच्छीमारांसाठी मारक ठरणार आहेत. वास्तविक ही मासेमारी नारळी पौर्णिमा ते मे महिनाअखेर या कालावधीत केली जाते. जिल्ह्यामध्ये सुमारे ४०० पर्ससीन नौका आहेत. यातील एका नौकेवर सुमारे २५ ते ३० खलाशी काम करतात. त्यामुळे एकूण १० ते १२ हजार खलाशी या नौकांवर काम करतात. पर्ससीन नेट मासेमारी व्यवसायावर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असे सुवर्णदुर्गकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)१२ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड.रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे माजी संचालक नुरमहंमद सुवर्णदुर्गकर यांच्याकडून माहितीपर्ससीन नेट बंदीमुळे पूरक व्यवसायांवर परिणाम.बंदी आदेशानंतर महिना उलटला.लाखो रुपये उचल केलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार.