शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटी रूपयांच्या पीक कर्जाची उचल

By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST

५00 बागायतदारांचा समावेश : देवगड तालुक्यातील आंबा लागवड

पुरळ : देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांनी विविध बँकांकडून सुमारे २५ कोटीचे आंबा पीक कर्जाची उचल केली असून सुमारे ५०० आंबा बागायतदारांच्या सात-बारावर आंबा पीक कर्जाच्या बोजाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून १० कोटीचे आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. आंबा पीक कर्जाच्या व्याजाला सवलत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी कर्ज घेत असल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी शासनाच्या अनेक कर्ज सवलती योजना आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीकोनातून विविध बँकांनी कर्ज पुरवठा करीत आहेत. देवगड तालुक्यामध्ये सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा कलम लागवड आहे. यावर्षी म्हणजेच सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात बँक आॅफ इंडिया देवगड, मिठबाव, शिरगाव, तळेबाजार, वाडा, पडेल, विजयदुर्ग या शाखांमधून सुमारे १० कोटीचे आंबा पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. आंबा पीक कर्जाला व्याज सवलत आहे. पंजाबराव देशमुख या योजनेतून आंबा पीक कर्जाला व्याज सवलत देण्यात येते. शेतकऱ्यांना सधन बनविण्याच्या दृष्टीकोनातून बँक आॅफ इंडिया सवलतीपर कर्ज देऊन प्रयत्न करीत आहे. देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून व दलालांच्या कर्जाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वप्रथम प्रत्येक वर्षाला २५ ते ३० कृषी मेळाव्याचे आयोजन करून कृषीविषयक कर्जाची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रगतशील बनविण्याच्या मार्गावर नेण्याचे काम या बँकेने केले असून पुढे करण्याचेही काम ही बँक करीत आहे. फळ लागवड आंबा प्रक्रिया उद्योग स्वतंत्र आंबा विक्री केंद्र उभारून आज देवगडचा शेतकरी बँकांच्या अर्थ सहाय्याने उभारी घेत आहे. कर्ज घेण्याची एक मनामध्ये मानसिकता वेगळी होती. मात्र, ही मानसिकता शेतकऱ्यांची बदलून लाखो रूपयांचे कर्ज घेऊन बागायतदार उभारी घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रगत असल्याचे व सधन असल्याचे म्हटले जाते. याचे एकमेव कारण तेथील शेतकरी शेतीविषयक शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणून कोकणी शेतकरीही झेप घेत आहे. मात्र, कोकणी शेतकऱ्याला निसर्गाची साथ योग्य प्रमाणात मिळत नसल्याने तो थोडाफार मागे आहे. निसर्गाने कोकणी शेतकऱ्याला साथ दिली तर कोकणातील शेतकरी उत्पन्नाच्या बाबतीत देशामध्ये अग्रेसर असू शकतील, याबाबत शंका असण्याची गरज नाही. (वार्ताहर)दलालांची पिळवणूक थांबण्यास मदत होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, अर्बन बँक देवगड, विविध सहकारी सेवा सोसायट्या, स्टेट बँक, युनियन बँक यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सुमारे १५ कोटीचे आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. काही वर्षापूर्वी आंबा बागायतदार हा दलालांकडून कर्ज घेऊन आंब्याची मशागत व कलम लागवड करायचे. यामुळे दलाल वर्गाकडून बागायतदारांची पिळवणूक करून आगावू कर्ज घेतल्याने आंबा पेटीमध्ये पेटीचा भाव कमी द्यायचे. ही पद्धत आजही दलालांकडून कर्ज घेतलेल्या आंबा बागायतदारांबाबत होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत.