शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

देवखेरकी गावाने गाठले मनरेगाचे २५ टक्के उद्दिष्ट

By admin | Updated: July 28, 2015 00:30 IST

सरपंच, ग्रामसेवकांचा एकत्रित परिणाम : चिपळूण तालुक्याला ११ हजार ८५० दिवसांचे होते उद्दिष्ट

सुभाष कदम - चिपळूण -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्याला ११ हजार ८५० दिवसांचे कामाचे उद्दिष्ट होते. त्यातील १५ हजार २३५ दिवसांचे काम पूर्ण झाले असून, एकट्या देवखेरकी गावात २ हजार ७१६ दिवस मजुरांना काम मिळाले. चिपळूण तालुक्यात देवखेरकी प्रथम स्थानावर आहे. देवखेरकीचे सरपंच रमेश हळदे व ग्रामसेवक अभिजीत ढेंबरे यांनी योजना प्रभावीपणे राबवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करताना अनेक अडचणी येतात. आॅनलाईन यंत्रणा असल्याने वेळेवर मजुरांना मजुरी मिळत नाही. तुटपुंजी मजुरी असल्याने मजूर मिळणे अवघड होते, अशा अनेक तक्रारी या योजनेबाबत केल्या जातात. परंतु, देवखेरकी गाव याला अपवाद आहे. देवखेरकी गावाला तालुक्याचे ३० दिवसांचे उद्दिष्ट होते. पण या गावाने २ हजार ७१६ दिवस प्रत्यक्षात काम करुन तालुक्याचे २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. देवखेरकीत ग्रामस्थांच्या सहभागाने हुंबरवाडी ते अमृतेश्वर मंदिर व्हाया देऊळवाडी रस्ता तयार करणे हे परिपूर्ण नवीन काम पूर्ण करण्यात आले. तळ्याचीवाडी अमृतेश्वर मंदिर खडीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ही दोन कामे मार्गी लागावीत, यासाठी देवखेरकी ग्रामस्थ, तत्कालीन गटविकास अधिकारी गणेश पिंपळे यांना भेटले होते. यावेळी हे काम मंजूर करण्यासाठी पिंपळे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पदभार स्वीकारलेले गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी चांगले सहकार्य केले.ग्रामस्थांनीही त्यांना चांगली साथ दिली. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत ग्रामस्थांनी चिकाटीने ही दोन्ही कामे पूर्ण केली आहेत. ग्रामस्थांनी ही कामे केल्यामुळे त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळाला, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला व आपलेच काम समजून त्यांनी काम केल्याने कामही दर्जेदार झाले. या कामाची पाहणी राज्य गुणवत्ता निरीक्षक एन. एच. घोडेस्वार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कामाचे त्यांनी कौतुक केले. सरपंच हळदे, ग्रामसेवक ढेंबरे व ग्रामस्थांना त्यांनी धन्यवाद दिले. हे काम पूर्ण होण्यासाठी तालुकास्तरावर सहाय्यक अभियंता अविनाश जाधव, कनिष्ठ सहाय्यक नोमेश कारेकर, तांत्रिक अधिकारी आरती बागकर, डाटा आॅपरेटर रंजना मोरे व ग्रामरोजगार सेवक सुधीर हळदे यांचे ग्रामपंचायतीला चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे मजुरांना वेळेवर मजुरी मिळाली व कामही वेगात झाले.देवखेरकी तळ्याचीवाडी परिसरातील लोकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी चांगला मार्ग नव्हता. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चिंचोळ्या पायवाटेने जावे लागत असे. आजारी असलेल्या रुग्णाला डोलीतून मुख्य रस्त्यावर आणावे लागे. ही गैरसोय या नवीन रस्त्यामुळे दूर झाली आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.देवखेरकीवासीयांचे आराध्य दैवत देव अमृतेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. हे पुरातन जागृत देवस्थान असल्याने अनेक पर्यटकही येथे येत असतात. अमृतेश्वरची यात्राही मोठी असते. त्यामुळे हा नवीन रस्ता सर्व सोयीचा झाला आहे. या रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मिटल्याने गावात समाधान आहे. चिपळूण तालुक्यात मनरेगाअंतर्गत निवडलेल्या ९ ‘मॉडेल व्हिलेज’मध्ये देवखेरकी गावचा समावेश नसतानाही या गावाने चांगले काम करुन नवा आदर्श निर्माण केला आहे.