देवगड : देवगड पंचायत समिती आणि तालुक्यातील ग्रामपंचायती शासनाच्या विविध अभियानात अग्रेसर असून, जिल्ह्यात २३ गावे लोकराज्य ग्राम बनल्यामुळे महाराष्ट्रभर शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक हे देवगड तालुक्यातील २३ गावांतील घराघरांत पोहोचण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती शासनाचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.देवगड पंचायत समिती येथे ग्रामपंचायती मासिक कामकाज बैठकीत गटविकास अधिकारी विजय चव्हाण बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे, सहायक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) आर. एल. शिंदे, सांडवे, धालवली, ओंबळ, हडपीड, बुरंबावडे, चाफेड, उंडिल, मिठमुंबरी, मोंडपार, रहाटेश्वर, गढीताम्हाणे, चांदोशी, पावणाई, वानिवडे, गवाणे, शिरवली, महाळुंगे, लिंगडाळ, कुणकवण, पडवणे, फणसे, कातवण गावचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.कुणकेश्वर सरपंच दीपिका मुणगेकर म्हणाल्या, लोकराज्य ग्राम हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमात तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीही उस्फूर्तपणे सहभागी होतील. शासनाचा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर असाच राबवावा असे आवाहनही यावेळी दीपिका मुणगेकर यांनी केले. (प्रतिनिधी)सिंधुुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवरगटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले, लोकराज्य ग्राम करावे या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामपंचायतींना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार केल्यामुळे लोकराज्य हे मासिक तालुक्यातील २३ गावांत पोहोचणार आहे. महाराष्ट्रात एकावेळी सर्वाधिक ग्रामपंचायती लोकराज्य ग्राम फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या आहेत. लोकराज्य या मासिकास गौरवशाली पंरपरा आहे. जिल्ह्यात ३१ गावे बनली लोकराज्य ग्रामसंध्या गरवारे म्हणाल्या, पंचायत समिती सभापती डॉ. मनोज सारंग व गटविकास अधिकारी विजय चव्हाण, २३ गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व लोकांच्या पाठिंब्यामुळे सर्व गावे लोकराज्य ग्राम झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ गावे लोकराज्य ग्राम झाली आहेत. त्यापैकी सर्वाधिक २४ गावे लोकराज्य ग्राम एकाचवेळी होण्याचा मान देवगड तालुक्याला मिळाला आहे.
देवगडातील २३ गावे बनली लोकराज्य ग्राम
By admin | Updated: August 2, 2015 20:44 IST