शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

२२ अपघातात दोघांचा मृत्यू

By admin | Updated: December 29, 2014 00:08 IST

ओरोस हद्दीतील एका वर्षातील आकडेवारी : वाढते अपघात थांबविण्याची गरज

विनोद परब - ओरोस -सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वर्षअखेरीस ओरोस परिसरात, महामार्गावर २२ अपघात झाले आहेत. या अपघातात कित्येकजण जखमी आहेत. आतापर्यंत ओरोस हद्दीत दोन युवकांना प्राण गमवावे लागले आहेत.अपघातांच्या वाढत्या प्रमाणात युवापिढीचा जास्त भरणा आहे. त्यामुळे मोटारसायकल चालविताना आपला स्वत:चा जीव धोक्यात घालतात. याला आळा बसावा म्हणून महामार्गावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी धूम स्टाईल गाडी चालविणाऱ्यांना मोठी चपराक दिली असली तरी काही ठिकाणी युवावर्ग मोठ्या प्रमाणात गाडीचा वेग कमी न करता जाताना दिसत आहेत.सन २०१४ च्या वर्षाअखेरीस महामार्गावर ओरोसच्या हद्दीत घडलेल्या एकूण २२ अपघातात २० अपघात हे किरकोळ ठोकर किंवा इतर चुकीच्या कारणांमुळे घडले आहेत तर २ अपघातात मोटारसायकलस्वारांचा प्राण गेलेला आहे.यामध्ये ३ एप्रिल २०१४ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर कसाल हायस्कूलसमोर रात्री अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वाराला धडक दिल्यामुळे प्राण गमवावा लागला. २० नोव्हेंबर २०१४ रोजी कसाल सिंडीकेट बँकेसमोर मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूर ते मालवण जाणारी एस. टी. बसला ओरोस ते कसाल प्रवास करणाऱ्या मोटारसायकलस्वाराने समोरून ठोकर दिल्यामुळे मोटारसायकलस्वार सुहास सावंत (वय २८, रा. डिगस) याला प्राण गमवावा लागला.जिल्ह्यातील मोटारसायकलचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवा पिढीच्या वर्गातील जादा अपघात घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस पोलीस स्टेशनच्या हद्दीत ८ मार्च २०१४ रोजी दुपारी १२.३० वाजता ओरोस फाटा येथे मारुती ८०० कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार विशाल रामा ठाकर हे रस्त्यावर पडून जखमी झाले होते. ओरोसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, आनंद काळे, अमोल धुमाळ, आर. एस. देसाई यांनी घडणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवल्याचे बोलले जात आहे, अशी माहिती ओरोस पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.मार्च ते जुलैमधील अपघात१८ मार्च : दुपारी १.१५ वाजता तीन आसनी रिक्षा व ट्रक यांच्यात कुडाळ ते ओरोस येत असताना हुमरमळा खालचीवाडी येथे पाठिमागून येणाऱ्या ट्रकने ठोकर दिल्यामुळे अपघात घडला होता. रिक्षातील प्रवासी जखमी झाले होते. ही माहिती दत्ताराम शशिकांत बालम यांनी दिली होती. ५ मे : सायंकाळी ४ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर वासुदेव नारायण बाणे (रा. बांदा) मोटारसायकल व एस. टी. बस यांच्यात झालेल्या कसाल ते शिडवणे येथे जात असता एस. टी.ची मोटारसायकलस्वाराला ठोकर लागून किरकोळ जखमी झाले होते. २३ मे : ओरोस येथे टेंपो चालक आपल्या ताब्यातील टेंपो घेऊन गोव्याच्या दिशेने जात असताना ओरोस पेट्रोलपंप येथे ब्रेक निकामी होऊन टेंपो पलटी झाला होता. २५ मे : पहाटेच्या सुमारास खर्येवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर कार कणकवली ते कुडाळच्या दिशेने जात असताना झाडाला ठोकर दिल्यामुळे अपघात घडला. ३० मे : कसाल बालमवाडी येथे महामार्गावर सिताराम परब हे मोटारसायकलने जात असताना पादचारी दाजी मेस्त्री यांना ठोकर दिल्यामुळे अपघात घडला. ४ जून : कुंदे येथे जाणारी अ‍ॅपे टेंपो पलटी होऊन अपघात घडला होता. यात दहा ते बारा माणसे जखमी झाली होती. महेश आत्माराम घोगळे (रा. कुंदे परबवाडी) यांच्या मालकीचा अ‍ॅपे टेंपो होता. १३ जून : अणाव बाह्मणवाडी येथे ओमनी कार व मोटारसायकल यांच्यात अपघात घडला होता. यामध्ये अशोककुमार सैनी हे जखमी झाले. याच दिवशी महामार्गावर नवनीत हॉटेलनजीक मोटारसायकल व कंटेनर यांच्यात अपघात घडला होता.८ जुलै : महामार्गावर हुमरमळा वरचीवाडी येथे अ‍ॅक्टीव्हा व स्टार सिटी मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन अ‍ॅक्टीव्हा मोटारसायकलवरील महिला जखमी झाली होती. जुलै ते डिसेंबरचे अपघात२५ जुलै : ओरोस येथे युनियन बँकेसमोर विकास तायशेटे (रा. कणकवली बाजारपेठ) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन येत असताना मोटारसायकल व बजाज डिस्कव्हर यांच्यात अपघात घडला. १५ आॅगस्ट : महामार्गावर ओरोस सुलोचनानगर येथे रुपेश आंबेरकर (रा. आंब्रड) यांची मोटारसायकल व ओमनी कार यांच्यात अपघात घडला. ७ सप्टेंबर : महामार्गावर पीठढवळ नदी येथे जोशीला दिप्ती घोगळे (रा. हुमरमळा राणेवाडी) दुचाकीने ओरोस फाटा ते हुमरमळा जात असताना अपघात झाला.२९ सप्टेंबर : महामार्गावर मोटारसायकल व एस. टी. बस यांच्यात शिरगांव ते कुडाळ अशी बसगाडी जात असता मोटारसायकलस्वाराला धडक बसून मोटारसायकलस्वार जखमी झाला होता.२० आॅक्टोबर : कसाल ते पोखरण रिक्षाने प्रवास करणाऱ्या रिक्षाच्या पुढील चाकाचे एक्सेल तुटून रिक्षाचे चाक निखळून पडल्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षातील महिला जखमी झाली होती.२० नोव्हेंबर : कसाल येथे महामार्गावर सिंडीकेट बँकेच्यासमोर ओरोस ते कसाल प्रवास करणारा मोटारसायकलस्वार व कोल्हापूर ते मालवण एस. टी. बस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन मोटारसायकलस्वार जखमी झाला होता.१ डिसेंबर : मालवण ते कसाल महामार्गावर सुकळवाड ते रानबांबुळी प्रवास करणारे दिगंबर म्हाडेश्वर (रा. रानबांबुळी) हे मोटारसायकलने येत असता समोरून येणाऱ्या मोटारसायकलने ठोकर दिली व अपघात घडला.४ डिसेंबर : महामार्गावर हुमरमळा येथे राजेश पिपरे (रा. बेळगांव) यांच्या नॅनो कारला अपघात होऊन गाडी रस्त्याच्या खाली उतरली व गाडीतील प्रवासी जखमी झाले होते. बेळगांव ते कणकवली ते प्रवास करीत होते.८ डिसेंबर : ओरोस रवळनाथ मंदिर ते ओरोस खर्येवाडी असा प्रवास करणारी रिक्षा व मोटारसायकल यांच्यात समोरून धडक दिल्याने अपघात घडला.९ डिसेंबर : कसाल येथे महामार्गावर रमेश रामा आयरे यांच्या मालकीची टोयाटो गाडीवरील ताबा सुटल्यामुळे पलटी होऊन अपघात घडला होता.युवकांना आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावर सन २०१४ च्या वर्षअखेरीस २२ अपघात घडले असून आजपर्यंत कित्येकजणांनी प्राण गमावले आहेत. तरीही मोटारसायकलस्वारांची धूम स्टाईल कमी होत नाही. युवकांकडून होत असलेल्या ‘धूम स्टाईल’ हा परिणाम आहे. यासाठी खास करुन युवकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, माहिती ‘लोकमत’शी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी दिली.