शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

गणेशोत्सवात कोकणात १९४५ गाड्या

By admin | Updated: August 30, 2015 22:47 IST

भक्तांची सोय : कुर्ल्यातील प्रादेशिक कार्यालयात वाहतुकीचे नियोजन

चिपळूण : कोकणात गौरी-गणपती उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणात घरोघरी गणपतीची मूर्ती आणून मनोभावे पूजा केली जाते. दरवर्षी चाकरमानी या उत्सवासाठी आपल्या गावाकडे येत असतात. या अनुषंगाने मुंबई, ठाणे येथून १ हजार ९४५ एस. टी. बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्हा कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी दिली. कुर्ला येथील प्रादेशिक कार्यालयात गौरी - गणपती सणानिमित्त वाहतूक नियोजनाबाबत प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी एस. टी.च्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून ३३२ खिडकीवर, तर ग्रुप बुकिंगकरिता ४१४ खिडकीवर अशा ७४६ जादा बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कल्याण आगारातून २८ एस. टी. बसेस, तर विठ्ठलवाडी आगारातून १०९ जादा बसेस अशा १३७ जादा गाड्या कोकणात धावणार आहेत. सावंतवाडी, मालवण, देवगड, नाटे, रत्नागिरी, कणकवली, राजापूर, माखजन, साखरपा, देवरुख, भडवली, शिरवली, गुहागर, गराटेवाडी, चिपळूण दापोली, चोरवणे, पोलादपूर, महाड व अलिबाग मार्गावर या बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काळात स्थानकात असलेली अस्वच्छता दूर करून आरक्षण देताना स्टेजेसची माहिती नियंत्रकांना असायला हवी. ४४ ऐवजी ३९ आसने असणाऱ्या बसेस, गळक्या गाड्या यांची अधिकाऱ्यांनी प्रवाशांना योग्य माहिती देणे, आगारप्रमुखांनी वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे करणे, विभाग नियंत्रकांचे आदेश पाळणे, गाडीवर ताडपत्र्या टाकणे, गाडीत प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करणे, बाहेरुन येणाऱ्या चालकांना रस्त्याची माहितीपत्रके देणे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. एस. टी. सोडण्यासंदर्भात समस्या निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन प्रादेशिक व्यवस्थापक तोरो यांनी दिले असल्याचे कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिर्के यांनी सांगितले. (वार्ताहर)मुंबई, ठाणे येथून १ हजार ९४५ एस. टी. बसेस सोडण्यात येणार.ठाणे जिल्ह्यातून ३३२ खिडकीवर, तर ग्रुप बुकिंगकरिता ४१४ अशा ७४६ जादा बस सोडण्याची व्यवस्था.विठ्ठलवाडी आगारातून १०९ जादा बसेस अशा १३७ जादा गाड्या.विविध मार्गांवर सुटणार बसेस.