शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जिल्ह्यात १५९२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीच नाहीत

By admin | Updated: August 28, 2015 23:27 IST

जिल्हा परिषद : ३४९ अंगणवाड्यांना समाजमंदिर, सार्वजनिक ठिकाणांचा आधार

रहिम दलाल- रत्नागिरी  जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी अनुदान असतानाही जमीन मिळत नसल्याने १५१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे ३४९ अंगणवाड्या समाज मंदिर व सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत.जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १५१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाज मंदिरात व सार्वजनिक ठिकाणी भरवण्यात येतात़ या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे़ मात्र, जागेअभावी इमारती कशा बांधणार, असा प्रश्न आहे़ सुरुवातीला अंगणवाडीसाठी ३ लाख ५० हजार रुपये देण्यात येत होते़ त्यामध्ये वाढ होऊन ४ लाख ५० हजार रुपये झाले़ त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाल्याने आता अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी ६ लाख रुपये अनुदान देण्यात येते़ ज्या ३४१ अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या, त्या प्रत्येक इमारतीसाठी ४ लाख ५० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते़ जिल्ह्यात १५१२ अंगणवाड्यांना अजूनही स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. अनुदान उपलब्ध असतानाही केवळ जमीन मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. या अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने ५८८ अंगणवाड्या खासगी इमारतींमध्ये भरवण्यात येतात. ५७५ अंगणवाड्यांनी प्राथमिक शाळांचा आश्रय घेतला आहे, तर ३४९ अंगणवाड्यांना गावातील समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणांचा आधार देण्यात आला आहे. अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जमीन मिळावी, यासाठी दानशुरांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून वेळोवेळी आवाहनही करण्यात आले होते. मात्र, त्याला अगदी किरकोळ प्रमाणात प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील केवळ २० अंगणवाड्यांना दानशुरांनी आपली जमीन पाच पैसेही न घेता दान केली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात २० अंगणवाड्यांना नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान वेळेत खर्च होणे आवश्यक आहे.मंडणगड ५८दापोली ७१खेड ३५चिपळूण १९गुहागर ३३संगमेश्वर ४४रत्नागिरी १४राजापूर ३६एकूण३४९आपल्या भागातील अंगणवाडीला स्वत:ची इमारत असावी, असा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्यांकडूनही होताना दिसत नाही.