शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२ काथ्या उद्योग उभारणार

By admin | Updated: March 27, 2017 23:54 IST

दीपक केसरकर : बचत गटातून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी; कुडाळमध्ये सिंधुसरस प्रदर्शनाचे उद्घाटन

कुडाळ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून जिल्ह्यात काथ्या उद्योगाचे १२ कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांनी बचतगटातून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्यावतीने बचतगटांच्या वस्तंूचे ‘सिंधुसरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रम २०१७’ व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन २६ ते २७ मार्च या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले आहे. या सिंधुसरस प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, प्रकल्प संचालक सुनील रेडकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरे, कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक अभय शिरसाट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत सन १९९९ पासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसहाय्यता गट, स्वरोजगारी यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. या स्वरोजगारीने तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा महिला बचतगटांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. पहिल्याच दिवशी सिंधुसरस प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)