शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११0 डॉक्टर धावले

By admin | Updated: February 12, 2017 23:34 IST

ंकॅन्सरबाबत केली जनजागृती : कणकवलीत ‘कनकरन मॅरेथॉन’चे आयोजन

कणकवली : शरीरासाठी धावणे हा सुंदर व्यायाम असून याबाबत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याकरिता कार्यरत असलेले सिंधुदुर्गातील काही डॉक्टर आपले आरोग्य चांगले रहावे याकरिता पहाटे नियमित धावतात. ही धावण्याची चळवळ वाढत असून रविवारी पहाटे कणकवली येथे जिल्ह्यातील ११० हून अधिक डॉक्टरांनी ‘खोजो कॅन्सर, मिटाओ कॅन्सर’ असा संदेश देत ‘कनकरन मॅरेथॉन’ च्या माध्यमातून दौड केली.डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग, इंडियन मेडिकल असोसिएशन, कणकवली यांच्या विद्यमाने ‘कनकरन’चे आयोजन केले होते. उपजिल्हा रुग्णालयासमोर डॉ. एम. डी. म्हसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रोटरी क्लब आॅफ कणकवली सेंट्रलच्यावतीने येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये १९ फेब्रुवारी रोजी ‘मिशन कॅन्सर कंट्रोल इंडिया’ अंतर्गत कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन कणकवलीत आणण्यात येणार आहे. याबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली. ५ किलोमीटर, १० किलोमीटर, १५ किलोमीटर तसेच २१ किलोमीटर अंतर अशा विविध टप्प्यांमध्ये ही मॅरेथॉन घेण्यात आली. पुरुष डॉक्टरांबरोबरच महिला डॉक्टर व मुलेही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. विविध अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून प्रथम तीन क्रमांकाचे विजेते घोषीत करण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी डॉ. बी. एम. म्हाडेश्वर, डॉ. अनंत नागवेकर, डॉ. चं. फ. राणे, डॉ. डी. व्ही. सोडल. डॉ. शेळके, डॉ. सूर्यकांत तायशेट्ये, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. सुहास पावसकर, डॉ. समीर नेवरे, डॉ. नितीन शेट्ये, डॉ. नीलेश कोदे, डॉ. विनय शिरोडकर, डॉ. संजय पावसकर, डॉ. प्रशांत मोघे, डॉ. गीता मोघे, डॉ. हेमा तायशेट्ये आदी डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.(प्रतिनिधी)