शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतून ११ अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 00:32 IST

फोंडाघाटमधून संदेश पटेल, कलमठ प्रज्ञा ढवण तर नाटळसाठी अक्षता सावंत

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रविवारी कणकवली तालुक्यात ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे ३ तर पंचायत समितीच्या ८ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. फोंडाघाट जिल्हा परिषदेसाठी संदेश पांडुरंग सावंत -पटेल यांनी अपक्ष म्हणून, कलमठमधून प्रज्ञा प्रदीप ढवण यांनी भाजपमधून तर नाटळमधून अक्षता अनिल सावंत यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी कणकवली तहसील कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांची वर्दळ दिसून येत होती. तालुक्यातील पंचायत समितीच्या सात प्रभागांसाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये कासार्डेतून सुधाकर सुरेश पेडणेकर (शिवसेना), बिडवाडी- विजय सखाराम तांबे (भाजपा), लोरे-प्रदीप बळीराम गुरव (अपक्ष), वरवडे-प्रतीक्षा प्रशांत सावंत (भाजपा), कलमठ-विश्वनाथ बाबाजी आचरेकर (शिवसेना), नाटळ-विशाखा विलास पुजारे (शिवसेना) तर नरडवे प्रभागातून संतोष रामचंद्र घाडीगांवकर (शिवसेना) व गणेश सहदेव ढवळ (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कणकवलीच्या प्रातांधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे हे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. कलमठ जिल्हा परिषदेसाठी भाजपतर्फे प्रज्ञा ढवण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, गितांजली कामत, भाई परब, प्राची कर्पे, विजय चिंदरकर, सदा चव्हाण, संतोष पुजारे, प्रथमेश तेली, अमोल चिंदरकर, भूपेश चव्हाण,संतोष मेस्त्री, सुनील गावडे, नीलेश पुजारे, महेश मेस्त्री, सोनू शेख, विजय खरात, सुरेश वर्देकर, प्रदीप ढवण, प्रसाद देसाई, वेदस्तु ढवण आदी उपस्थित होते. फोंडाघाटमधून संदेश पटेल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी हर्षनंद लाड, उत्तम रेवडेकर, कृष्ण पारकर आदी उपस्थित होते तर नाटळमधून अक्षता सावंत यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तेव्हा सोसायटी चेअरमन प्रदीप सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, विलास पुजारे आदी उपस्थित होते. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)