शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

१0५ जणांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: December 14, 2015 00:16 IST

जिल्ह्यात तपासणी मोहीम : २९ वाहनचालकांवर कारवाई

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वाहतूक शाखेमार्फत १ ते १२ डिसेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीत महाराष्ट्र मोटार कायद्यानुसार अवैध वाहतूक, दारू पिऊन वाहन चालविणे, कागदपत्रे नसलेल्या वाहनांची तपासणी केली. यावेळी २९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, तर १०५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.जिल्हा वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम झाली. या मोहिमेसाठी वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांचे कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र मोटार कायद्यानुसार वाहनांचा इन्शुरन्स नसेल, परवाना नसेल, ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली.यात २९ वाहनचालकांवर कागदपत्रे नसल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ८० वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याच दरम्यान ब्रेथ अल्कोहोल अ‍ॅनालायझर मशीनने वाहनचालकांची तपासणी केली. २५ वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)२४ हजार रुपये दंड वसूलजिल्हा वाहतूक शाखेने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अवैध वाहतूक परवाना नसणे, कागदपत्रे नसणे, आदी प्रकारच्या २९ वाहनालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून २४ हजार २०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.हुंबरठ नाक्यामुळे मद्यपी चालकांना चापजिल्ह्यातील जनतेला सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी कणकवली येथील हुंबरठ तिठ्यावर तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या नाक्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांना चाप बसला आहे. परिणामी प्रवाशांची सुरक्षित वाहतूक होत असल्याचेही वाहतूक पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले.