शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जलयुक्त शिवारची १ कोटीची कामे सुरू

By admin | Updated: March 2, 2016 23:54 IST

डायलिसीसच्या १६ मशिन्स : सिद्धिविनायक ट्रस्टकडून अनुदान, नरेंद्र राणे यांची माहिती

कणकवली : मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रूपये देण्यात आले होते. या कामांना सुरूवात झाली आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना डायलिसीस यंत्रणा बसवण्यासाठी १ कोटी ५१ लाख ८४ हजार रूपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे सतीश पाडावे, जिल्हा कृषी अधीक्षक शेळके, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर.राठोड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आदी उपस्थित होते. सिद्धिविनायक ट्रस्टकडून राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी १ कोटी रूपयांचे अनुदान जलयुक्त शिवार योजनेसाठी देण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील हडपीड गावात मातीनाला बंधारा, सिमेंट बंधारा, वळवणी बंधाऱ्यासाठी २० लाख रूपये, कणकवली तालुक्यातील ओझरम गावात बंधाऱ्यांसाठी २५ लाख रूपये, मालवण तालुक्यातील चिंदर गावात बंधाऱ्यांसाठी १४ लाख रूपये, कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात मातीनाला, सीसीटी, लूज बोल्डर स्ट्रक्चरसाठी २० लाख रूपये तर सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी गावातील बंधाऱ्यांसाठी २० लाख रूपये असा आतापर्यंत ९९.९२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया झाली असून कामांना सुरूवात झाली आहे. आणखी ६.५ कोटी या कामांसाठी देण्यात येणार आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ लाख ११ हजार रूपये मार्च महिन्यात मिळणार आहेत. पूर्ण राज्यातील रूग्णालयांना डायलेसिस मशिन्स देण्यासाठी ७.५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील देवगड ग्रामीण रूग्णालय, मालवण ग्रामीण रूग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रूग्णालयासाठी प्रत्येकी ४ डायलेसिस मशिन्स देण्यात येणार असून सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयासाठी प्रत्येकी २ मशिन्स देण्यात येणार आहेत. प्रत्येक मशिन ६ लाख २७ हजार रूपयांची असून ती बसवण्यासाठी प्रत्येकी ३ लाख २२ हजारांचा खर्च येणार आहे. असे एकूण १ कोटी ५१ लाख ८४ हजार रूपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. मात्र, ही यंत्रणा बसवण्यापूर्वी ती चालवणारे तंत्रज्ञ संबंधित रूग्णालयात उपलब्ध आहेत याची खात्री केल्यानंतरच यंत्रणा दिली जाईल, असे नरेंद्र राणे यांनी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ट्रामा केअरसाठी प्रयत्नकासार्डे येथे राज्यशासनाने ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले आहे. कासार्डे येथे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे केंद्र अन्यत्र हलवून ती जागा ट्रॉमा केअरला दिल्यास ट्रस्ट ट्रॉमा केअर सेंटर उभारू शकते. त्यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आल्याची माहिती नरेंद्र राणे यांनी दिली.३५ लाखांची पुस्तके वितरीतसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अकरावी ते पंधरावी या कक्षांची एकूण ३५ लाखांची पुस्तके ट्रस्टमार्फत देण्यात आली आहेत. सिंधुदुर्गातील खारेपाटण, तळेरे, कासार्डे, असरोंडी हायस्कूलला वितरीत करण्यात आल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.