शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधितांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ कागदावरच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 15:55 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची घोषणा सिडकोने केली होती, परंतु प्रभावी अंमलबाजवणीअभावी ही घोषणा कागदावरच राहिली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची घोषणा सिडकोने केली होती, परंतु प्रभावी अंमलबाजवणीअभावी ही घोषणा कागदावरच राहिली आहे. त्यामुळे विमानतळबाधितांना आवश्यक माहिती मिळविण्यासाठी सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत.आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी बारा महसुली गावातील ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीचा मोबदला म्हणून संबंधित प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात आले आहेत. नव्याने विकसित होणा-या पुष्पकनगरमध्ये हे भूखंड वाटप करण्यात आले आहेत. विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात महत्त्वाचा अडथळा असलेल्या दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थलांतरित गावांना वडघर आणि फुंडे वाहळ येथे पर्यायी भूखंड देण्यात आले आहे. एकूणच भूसंपादन आणि पुनर्वसन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा हा संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने सिडकोने विमानतळबाधितांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याची घोषणा केली होती. या संकेतस्थळावर प्रकल्पग्रस्तांच्या संपादित जमिनीचा तपशील, त्यांना देण्यात आलेला पर्यायी भूखंड, अ‍ॅवॉर्ड तसेच इतर तपशील उपलब्ध करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. सिडकोच्या या भूमिकेचे विमानतळबाधितांनी स्वागत केले होते. अशाप्रकारचे संकेतस्थळ उपलब्ध झाल्यास भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबतची आवश्यक माहिती मिळविणे सहज सोपे होईल, असा आशावाद प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला होता. परंतु तीन वर्षे उलटून गेले तरी अशाप्रकारचे कोणतेही संकेतस्थळ तयार करण्यात आलेले नाही. अन्य आश्वासनाप्रमाणे स्वतंत्र संकेतस्थळाची घोषणाही कागदावरच सीमित राहिल्याने प्रकल्पग्रस्तांची पुरती निराशा झाली आहे.