शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी झेडपीचं पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:09 IST

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू ...

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू केले आहे. या कामाला आपलेही पाठबळ मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी महाश्रमदानासाठी हजेरी लावत हाती टिकाव, खोरे घेतले.राज्यात गेल्या चार वर्षांपासून पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारण आणि मनसंधारणाचे मोठे काम होऊ लागले आहे. जलसंधारणामुळे पावसाळ्यात माळ, शिवारात पाणी साठून टंचाई दूर होऊ लागलीय. तसेच अनेक गावे पाणीदारही झाली आहेत. त्यामुळेच ही चळवळ आता पाणीदार म्हणून पुढे आली आहेत. या चळवळीत ग्रामस्थ सहभाग घेतात. तसेच अधिकारी आणि अभिनेतेही सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेने कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीत महाश्रमदानाचे आयोजन केलेहोते.महाश्रमदानादिवशी चिलेवाडीत सकाळी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे (ग्रामपंचायत) आदींसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित झाले. त्यानंतर श्रमदान होणाºया ठिकाणी सर्वजण गेले. कोणी हातात टिकाव घेतला तर कोणी खोरे, पाटी घेतली. जवळपास चार तास महाश्रमदानाचे काम करण्यात आले.उन्हाची तीव्रता वाढत असतानाही अधिकारी, कर्मचाºयांनी चिलेवाडीच्या पाणीदार चळवळीसाठी हातभार लावला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडतरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.श्रमदानासाठीपूर्व नियोजन...जिल्हा परिषदेच्या वतीने चिलेवाडीत महाश्रमदान करण्यात येणार होते. त्यासाठी पूर्व नियोजन करण्यात आलेले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्यासह इतर अधिकाºयांनी बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार नियोजन करून महाश्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे श्रमदानात अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाले होते.