शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

झेडपी पदाधिकाऱ्यांचे आज राजीनामे

By admin | Updated: January 13, 2016 01:10 IST

निर्णय झाला : वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर हालचालींना वेग

सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याला अखेर मुहूर्त सापडला आहे. सर्व पदाधिकारी बुधवारी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे आपले राजीनामे सादर करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीआधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी फलटण येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे राजीनामे देण्याची सूचना केली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आधार घेत पदाधिकाऱ्यांनी पदांना मुदतवाढ मिळविली. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हे राजीनामे देणे क्रमप्राप्त होते; परंतु पदाधिकाऱ्यांनी ‘पहले तुम’ असे म्हणत राजीनामे देण्याची टाळाटाळ केली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली होती. या बैठकीकडे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह सभापतींनी पाठ फिरविली होती. त्यामुळे ही बैठक कोणत्याही निर्णयाविना आटोपती घ्यावी लागली होती. एकमेकांच्या पायात पाय अडकवून पदांच्या रक्षणासाठी सुरू असलेले हे प्रयत्न वरिष्ठांच्या सूचनेमुळे फोल ठरले आहेत. रहिमतपूर दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडे याबाबत विचारणा केली. त्यामुळे मंगळवारी राजीनाम्यांच्या अनुषंगाने वेगाने चक्रे फिरली. बुधवारी सर्व पदाधिकारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे राजीनामे सादर करतील, अशी शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पक्षांतर्गत राजीनाम्यांची कार्यवाही पूर्ण करतील. त्यानंतर सर्व उपाध्यक्ष रवी साळुंखे व सभापती अमित कदम, शिवाजीराव शिंदे, मानसिंगराव माळवे, कल्पना मोरे हे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्याकडे राजीनामा सादर करतील. यानंतर अध्यक्ष सोनवलकर विभागीय आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे राजीनामा सादर करतील. गेल्या सभापतीपदाच्या निवडीच्या वेळीही अनेक इच्छुकांची नावे पुढे आले होते. मात्र, निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने विधानसभा निवडणूक अडचणी येऊ नयेत, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर त्यावेळीही वरिष्ठांनी बेरजेचे गणित करत ऐनवेळी निर्णय घेऊन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या होत्या. आता काय होणार याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)अध्यक्षपदासाठी सुभाष नरळे प्रबळ दावेदारजिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुभाष नरळे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माण तालुक्यातील राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी माण तालुक्याला अध्यक्षपद बहाल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.