सातारा : सातारा जिल्हा परिषदेने पंचायत राज सशक्तीकरण अभियान आणि राष्ट्रीय गौरव ग्रामसभा अभियानात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचाच गौरव झारखंड येथील जमशेदपूर येथे रविवार, दि. २४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. कराड पंचायत समितीचा द्वितीय क्रमांक लागला आणि खराडेवाडी ग्रामपंचायत यामध्ये बसली. केंद्राच्या समितीच्या पाहणीमध्ये कौतुक करण्यात आले. या समितीपुढे अध्यक्ष, उपाध्यक्षांनी वस्तूस्थिती सांगितली. दरम्यान, राज्यात पहिला मान मिळविल्याचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवार, दि. २४ रोजी झारखंड येथील जमशेदपूर येथे होणाऱ्या सोहळ्यात होणार आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह शिक्षण सभापती सतीश चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती वैशाली फडतरे, समाजकल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, गटविकास अधिकारी, खराडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी उपस्थित राहणार असून, त्यांनी गुरुवारी रात्री जमशेदपूरसाठी रेल्वेने प्रस्थान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव होणार असल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चैतन्य आहे. (प्रतिनिधी)पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा फायदाजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे तसेच सर्व सभापती आणि अधिकाऱ्यांनी समन्वयातून पंचायत राज सशक्तीकरण अभियानात भाग घेतला. विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषद या अभियानात पहिली आली. राजकीय इच्छाशक्तीला नोकरशाहीची साथ मिळाल्यामुळे हे यश मिळाले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा उद्या गौरव
By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST