शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची जिल्हा परिषदेने मागितली माहिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

फोटो जिल्हा परिषद... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हता कागदपत्रे पडताळणीचा ...

फोटो जिल्हा परिषद...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हता कागदपत्रे पडताळणीचा मार्ग मोकळा झाला आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषदेनेही माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुराव्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अभियंत्यांची चौकशी सुरू होणार असल्याने चलबिचल वाढली आहे. दरम्यान, याबाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’मधून सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेत अनेक शाखा व कनिष्ठ अभियंते आहेत. हे अभियंत्ये बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, लघू पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून संबंधित जिल्हा परिषदेत सेवा देत आहेत. मात्र, काहींनी नोकरी व पदोन्नती मिळविताना, बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय साताऱ्यातील संतोष शेंडे या माहिती कार्यकर्त्याने व्यक्त केला आहे, तर यापूर्वी त्यांनी माहिती अधिकाराखाली जिल्हा परिषदेतील शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती मागविल्या होत्या.

मागील चार महिन्यांपासून संतोष शेंडे यांना अभियंत्यांच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती मिळत आहेत. टपालाद्वारे सत्यप्रती मिळाल्यानंतर, त्यांना काही अभियंत्यांच्या कागदपत्रांबाबत शंका निर्माण झाली आहे. कारण काहींनी अस्तित्वात नसलेल्या विद्यापीठाचे प्रमाणपत्र जोडल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर काहींनी सत्यप्रती स्पष्टपणे दिल्याच नाहीत. त्यामुळे यामध्ये काहीतरी काळेबेरे असण्याचीही शंका त्यांनी उपस्थित केली. यामधूनच त्यांनी विभागीय आयुक्तांकडे जिल्हा परिषदेतील शाखा व कनिष्ठ अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीची मागणी केली होती.

विभागीय आयुक्तांनीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पत्र पाठवून योग्य कार्यवाहीची सूचना केली आहे, तर आता जिल्हा परिषदेनेही माहिती अधिकार कार्यकर्त्याला पत्र पाठविले आहे, तसेच अभियंत्यांबाबतचे पुरावे सादर करावेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्याविरोधात पुढील कार्यवाही करणे सोपे होईल, असेही त्यामध्ये म्हटले आहे. यामुळे जिल्हा परिषद लवकर शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पडताळणीस सुरुवात करणार हे स्पष्ट झालेले आहे.

चौकट :

अर्थसंकल्प सभेत ‘लोकमत’चा अंक दाखविला...

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा मार्च महिन्यात झाली होती. या सभेत सदस्य दीपक पवार, अरुण गोरे यांनी जिल्हा परिषदेत बोगस अभियंत्ये असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, दीपक पवार यांनी वृत्त आलेला ‘लोकमत’चा अंक सभागृहात सर्वांना दाखविला. त्यामुळे सभागृहात जोरदार खळबळ उडाली होती. त्यानंतर, अध्यक्ष उदय कबुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रे तपासणीतून सत्य नक्कीच बाहेर येण्यास मदत होणार आहे.

............................................................