शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभेत माईकसाठी ओढाओढ !

By admin | Updated: June 20, 2015 00:41 IST

या गोंधळामुळे सभागृहातील वातावरण आठवडा बाजाराप्रमाणे झाले होते.

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांमध्ये माईकची भलतीच ओढाओढ झाली. ‘मला बोलायचे आहे,’ असा आग्रह धरणाऱ्या अनेकांचा या चढाओढीत आवाज दाबला गेला. सभागृहातील प्रत्येक सदस्यांसमोर माईकची व्यवस्था केली जावी, अशी मागणीही यावेळी अनेकांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर होते. उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्यासह इतर सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. या सभेवेळी सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँगे्रसचेही सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहामध्ये पूर्वीसारखे प्रत्येक टेबलवर माईक उपलब्ध नव्हते. केबल लेस दोन माईक सभागृहात फिरविताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसत होती. त्यातच सभा सुरू झाल्यानंतर सदस्यांमध्ये विषय मांडण्यासाठी चढाओढ सुरू झाली. सुरुवातीला सभागृहात मागच्या बाजूला बसलेले सदस्य राहुल कदम व सदाभाऊ पवार यांनी आपले विषय मांडले. त्यामुळे माईक मागच्या बाजूला होता. दुसरा माईक पुढच्या बाजूला राष्ट्रवादीचे सदस्य बसलेल्या ठिकाणी होता. राजू भोसले, सतीश धुमाळ यांच्याकडे हा माईक होता. माईक असणाऱ्यांचा आवाज मोठा असल्याने त्यांचेच म्हणणे ऐकून घेतले जात होते. दरम्यान, या काळात काँगे्रसच्या सदस्यांमधून गोंधळ सुरू झाला. आपल्याला बोलूनच दिले जात नसल्याची नाराजी काँगे्रसच्या महिला सदस्या व्यक्त करत होत्या. काँगे्रसचे सातारारोडचे सदस्य अविनाश फाळके व भाजपचे दीपक पवार शेजारी-शेजारी बसले होते. त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. माईक मिळत नसल्याने काँगे्रसचे सदस्य नाराजी व्यक्त करत असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी वारंवार सूचना करून बोलायला सारखे-सारखे उठणाऱ्या सदस्यांना थांबविले. मात्र, अनेकांनी माईकच सोडला नाही, त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. या गोंधळामुळे सभागृहातील वातावरण आठवडा बाजाराप्रमाणे झाले होते. जगदीश जगताप, राहुल कदम या सदस्यांनी यावेळी नाराजी व्यक्त करून प्रत्येक सदस्याला माईक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी) भ्रष्टाचाराचा आरोपपाटण तालुक्यातील ३६ शिक्षकांची मेडिकल बिले शिक्षण विभागाने अडकवली आहेत. सोयीच्या बदलीसाठी पैसे घेतले जातात आणि जो पैसे देत नाही त्याची गैरसोय केली जाते. एनआरएचएमच्या भरतीमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप पाटणचे सदस्य सदाशिव जाधव यांनी केला. तसेच दोन्ही विभागांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी नावे जाहीर करण्याची सूचना केल्यानंतर नावासकट माणसं हजर करतो, असेही त्यांनी सांगितले. अविनाश फाळकेंच्या बोलण्यामुळे हशाअविनाश फाळके यांनी एक किस्सा सांगितला. ‘मला जिल्हा परिषदेच्या बाहेर अधिकारी ओळखत नाहीत,’ असे सांगून त्यांनी सभागृहात हंशा पिकविला. बोलत असताना माईक सुरू होत नसल्याने तो त्यांनी भिरकावून दिला.