शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

जिल्हा परिषद इच्छुकांनी ‘देव ठेवले पाण्यात!’

By admin | Updated: June 7, 2016 07:33 IST

बुध मतदारसंघ : कोण फायद्यात... कोण तोट्यात याचीच चर्चा

बुध : खटाव तालुक्यातील उत्तरेकडील बुध जिल्हा परिषद गटाची सद्याची रचना सातारा जिल्ह्यात सर्वात विचित्र आहे़ मोळ - मांजरवाडीपासून विसापूर- रेवलकरवाडी असा भला मोठा विस्तार असलेल्या बुध झेडपी गटाची आता पुनर्रचना होणार असल्याने ही गट आणि गण पुनर्रचना कोणाच्या फायद्याची तर कोणाच्या नुकसानाची होणार याची चर्चा मतदारांच्यात असून, अनेक इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहे.बुध जिल्हा परिषद गटात मागील दहा वर्षांपासून ललगुण गावचे काँग्रेस नेते मानाजीकाका यांचे वर्चस्व आहे़ तर त्यांच्या पत्नी विद्यमान सदस्या आहेत़ बुध जिल्हा परिषद गटाची विचित्र रचना आहे़ बुध गावापासून दोन-चार कि.मी वर असलेले वेटणे, रणशिंगवाडी ही मोठी गावे असूनही ती खटाव जिल्हा परिषद गटात येतात तर विसापूर, रेवलकरवाडी ही अगदी विरुद्ध दिशेला असूनही या बुध गटात समाविष्ट असल्याने या गटावर वर्चस्व मिळवण्यासाठी विसापूर आणि बुध असे दोन टोक तयार होत आहेत़ बुध गटात डिस्कळ आणि बुध असे दोन पंचायत समितीचे गण असून, कशा पद्धतीने गणाची फोड होत आहे, यावरच इच्छुकांची भवितव्य अवलंबून आहे़ राजापूर, गारवडी आणि ललगुण ही गावे काँगे्रस ग्रामपंचायतीचे आहेत तर या बुध गटात राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व असूनही गटातटाच्या राजकारणात राष्ट्रवादी मागे पडत असल्याचे चित्र आहे़ ललगुणचे कैलास घाडगे, विसापूरचे हरी साळुंखे तर डिस्कळचे प्रदीप गोडसे हे आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक; पण एकी नसल्याने आजवर त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांच्यातील दुहीचा मोठा फायदा मानाजीकाका घाडगे हे उठवत आहेत़ यावेळी बुध झेडपी गट पुनर्ररचनेत जर विसापूर, रेवलकरवाडी आदी परिसरातील गावे या गटातून वगळून पुसेगाव गटाला जोडण्याची शक्यता आहे जर असे झाले तर पुसेगाव गणातील रणशिंगवाडी आणि वेटणे ही गावे बुध जिप गटाला जोडली जातील़ पुसेगाव सुद्धा पंचायत समितीचा गण आहे; पण भविष्यात पुसेगाव गट तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)इच्छुकांची रेलचेलकाँगे्रसमधून मानाजीकाका घाडगे, बुधचे अशोकराव पुरे, पांगरखेलचे अमित जगताप याशिवाय गारवडीचे सरपंच शेडगे तर शिवसेनतून वर्धनगडचे सरपंच आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अर्जुन मोहिते यांचे एकमेव नाव आघाडीवरती आहे, तर भाजपाचे मेघराज निकम यांनीही जोरदार तयारी केली. त्यामुळे इच्छुकांनी बुध झेडपी गट पुनर्रचना कधी होते, याकडे डोळे लावले आहेत.सुंठे वाचून खोकला जाणार का?बुध झेडपी गटात विसापूरचे सरपंच सागर साळुंखे यांचा वारू चौफेर उधळत आहे़ त्यामुळे डिस्कळ, ललगुण मधील राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक प्रदीप गोडसे आणि कैलास घाडगे यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. जर विसापूर व परिसरातील गावे बुध गटातून वगळली तर सुंठे वाचून खोकला जाणार आहे, त्यामुळे विसापूर या गटातून वगळावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.आरक्षणवर अनेकांची भिस्तबुध जिप गटावर आरक्षण कसे पडते यावरच अनेकांची भिस्त आहे़ ओबिसी आरक्षण पडले तर प्रल्हाद चव्हाण आणि अशोक पुरे यांची रणनीती ठरणार आहे कारण राजपूर, बुध या भागांत ओबीसी समाजाची एक गठ्ठा मताचा आकडा लक्षणीय आहे़