शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST

सातारा : एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाकडून ...

सातारा : एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाकडून गावोगावी फवारणी करण्यात येणार आहे. परंतु सध्या सातारा जिल्ह्यात झिका व्हायरसचा एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महाबळेश्वरमधून गेल्या काही महिन्यांपूर्वी वटवाघळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यामध्ये झिका व्हायरस आढळून आला होता. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाकडून गावोगावी औषध फवारणी करण्यात येणार आहे. वटवाघूळमधील झिका व्हायरस अद्याप माणसाच्या शरीरामध्ये गेला नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारचा सातारा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. त्यामुळे केवळ खबरदारी म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

चौकट : झिका व्हायरसची लक्षणे

झिका आजाराची बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.

चौकट : कशामुळे होतो?

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून, तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फॅलिव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ दूषित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा धोक्याची बाब निर्माण झालेली आहे.

चौकट : उपाययोजना काय?

ताप उद्रेक झालेल्या गावात व आजुबाजूच्या ५ किमी परिसरातील सर्व गावातील साठवलेल्या पाण्याचे साठे दर आठवड्यातून एकदा रिकामे करणे गरजेचे आहे. तसेच डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. साठवलेल्या पाण्याचे साठे आठवड्याला रिकामे करता येत नाहीत, अशा पाण्याच्या साठ्यात टेमिफॉस (अबेट) या अळीनाशकाचा वापर योग्य प्रमाणात करावा. घरातील पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात टेमिफॉसचा वापर करू नये.

कोट : झिका व्हायरसचा धोका अद्याप आपल्या सातारा जिल्ह्यात नाही. मात्र, खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

डॉ. सचिन पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा