शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

सातारच्या हद्दवाढीला झेडपीचा हिरवा कंदील

By admin | Updated: December 2, 2014 23:29 IST

शिवेंद्रराजे पालिकेत : ‘क्रीडाई’ने रस्त्यांचे सुशोभीकरण करावे

सातारा : शहरातील प्रमुख तीन रस्त्यांवरील रस्तादुभाजकात वृक्षारोपण, सुशोभीकरण व देखभालीची जबाबदारी ‘क्रीडाई’ने घ्यावी. त्याबदल्यात त्यांनी या जागेत जाहिराती लावून खर्चाचा ताळमेळ बसवावा. त्याचबरोबर राजपथाच्या स्वच्छतेसाठी या रस्त्यावर बसविण्यात येणाऱ्या प्लास्टिक बकेटची जबाबदारी घ्यावी, असा प्रस्ताव आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी ‘क्रीडाई’च्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ठेवला. या प्रस्तावाला पदाधिकाऱ्यांनी तत्वता मान्यता दिली. बांधकामङ्कव्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी कामङ्ककरणाऱ्या ‘क्रीडाई’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. ‘कालिदास पंप ते सदर बझार, पोवई नाका ते विसावा नाका तसेच राजपथावर रयत शिक्षण संस्थेसमोरील दुभाजकावर वृक्षारोपण करुन सुशोभीकरण करावे. तसेच त्याच्या देखभालीचीही जबाबदारी स्वीकारावी. त्या मोबदल्यात संघटनेने जाहिराती करून येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसावावा,’ असा प्रस्ताव आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी ठेवला. ‘क्रीडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर राजपथाच्या स्वच्छतेसाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रायोजकामार्फत प्लास्टिक बकेट बसविण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. शहरातील काही ‘आयलँड’ प्रायोजकामार्फत विकसित करण्याबाबतही संघटनेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली. पालिकेच्या सहकार्याने शहरात घराघरांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ‘क्रीडाई’ने मुख्याधिकाऱ्यांपुढे ठेवला. शहराचा विकास होण्यासंदर्भात डेव्हलपमेंट प्लॅनमधील दाखल केलेल्या रस्त्यांचा ताबा घेणे व त्यांचा विकास करावा. पालिकेची हद्दवाढ मंजुरीच्या प्रस्तावास गती द्यावी. शहरासाठी अग्निशमन दल कार्यालय सुरू करावे. पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी. नळ कनेक्शनसाठी वारंवार रस्ता खोदावा लागू नये, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जलवाहिन्या टाकाव्यात आदी मागण्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. नगराध्यक्ष सचिन सारस, नगररचनाकार प्रशांत राजे, माजी नगरसेवक नासीर शेख तसेच ‘क्रीडाई’चे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. कमलेश पिसाळ, सचिव सुधीर शिंंदे, सुधीर ठोके, मंगेश वाडेकर, राहुल वखारिया, सुधीर घारगे, जयंत ठक्कर, उपेंद्र पंडित, अभिजित पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)आता चेंडू शासनाकडे...शहराचा विस्तार होत असताना पालिकेची हद्द मर्यादित राहिल्याने नागरी गैरसोर्इंसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी हद्दवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने हिरवा कंदील दाखवला आहे. शासनाकडून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असे सांगितले.