शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

टोल भरताच यमदूताचे दर्शन

By admin | Updated: November 23, 2014 23:43 IST

आनेवाडीजवळ धोका : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदाराचे दुर्लक्ष; वर्षापासून रेंगाळले पुलाचे काम

कुडाळ : भरमसाठ टोल वसुली करून वाहनचालकांचा खिसा कापणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीने प्रवासी, वाहनचालकांच्या जीवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. मुळात हा चौपदरी रस्ता व्यवस्थित नसताना सहापदरी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. मात्र, ठिकठिकाणी पुलांची, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळच पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणी खंडाळ्यातील अपघाताची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरी तातडीने या पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.आनेवाडी हे जावळीचे प्रवेशद्वार ओह. वरील २० ते २५ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याजवळ वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. टोलनाक्यावर गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाले की आनेवाडीकडून आलेल्या वाहनांना मार्गच मिळत नाही. याच ठिकाणी रिक्षा थांबा, बस थांबा देखील आहे. या थांब्यावर वाई, पुण्याकडे जाणारे शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत उभे असतात. साताराकडून उताराने अनेक वाहने वेगाने येऊन ताबा सुटल्याने अनेकदा या ठिकाणी फसली आहेत. आतापर्यंत जीवित हानी झाली नसली तरीदेखील वाहतूक अशीच एकेरी राहिली तर खंडाळ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. तसेच याच ठिकाणी ठेकेदाराने महामार्गालगत मोठा खड्डा खणल्याने आजूबाजूच्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर सुरू असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही कंत्राटदाराकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)नको हा टोलनाकाटोलनाक्यावर अनेकदा गाड्यांची दोन्ही बाजूला भली मोठी रांग लागते. त्यातच या अर्धवट पुलाचा अडथळा. सातारकडून रांग लागली की आनेवाडीच्या वरील गावांमधून येणाऱ्या वाहनांना तासन्तास महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहावी लागते. कारण ज्या ठिकाणी हा रस्ता महामार्गाला मिळतो, तिथेच या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एकाच लेनवरून वाहतूक सुरू असते. त्यामुळे आनेवाडीकडून येणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांवर ‘नको हा आनेवाडी टोलनाका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गालगत असलेल्या आनेवाडी फाट्यावर जवळपास वीस रिक्षा रात्रंदिवस उभ्या असतात. कधी-कधी मोठे सोळा चाकी ट्रेलर वेगात येतात. अशावेळी ते रिक्षावर येतात की काय अशी भीती वाटते. त्यामुळे आम्ही रिक्षास्टॉपवर उभ्या करून बाजूला बसण्यास सुरुवात केली आहे.- जीवन कर्पे,रिक्षाचालक, आनेवाडीआनेवाडी टोलनाक्याजवळच वर्षभरापासून पुलाचे काम सुरू असल्यामुळे एकाच लेनवरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.