शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या नव्या क्षेत्राला तरुणाईची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मोबाईलद्वारे अथवा ऑनलाईन नोंदणीनंतर अवघ्या काही मिनिटांत गरमागरम जेवण, नाष्टा, तर इलेक्ट्रॉनिक, गृहोपयोगी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मोबाईलद्वारे अथवा ऑनलाईन नोंदणीनंतर अवघ्या काही मिनिटांत गरमागरम जेवण, नाष्टा, तर इलेक्ट्रॉनिक, गृहोपयोगी, आदी वस्तू एक-दोन दिवसांत घरबसल्या अथवा नोंदणी केलेल्या ठिकाणावर उपलब्ध होते. या ऑनलाईन फूड आणि लॉजिस्टिक डिलिव्हरीने साताऱ्यातील ४०० हून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले आहे.

सध्या बहुतांश क्षेत्रात ऑनलाईन कामावरील भर वाढला आहे. हॉटेल इंडस्ट्रिजमधील ऑनलाईन फूड डिलिव्हरी देण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबई, पुणेनंतर आता त्या पद्धतीची सुविधा देणाऱ्या कंपन्यांचे साताऱ्यातही काम सुरू झाले आहे. सध्या जेवण, नाष्टा, आईस्क्रीम, पिझ्झा, आदी खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू ग्राहकांना घरपोच करणाऱ्या चार कंपन्यांच्या माध्यमातून सातारा शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे ४०० तरुण कार्यरत आहेत. त्यामध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या संबंधित कंपन्यांकडे नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांच्याकडून काम करणाऱ्या तरुणाला दोन टी-शर्ट, बॅग दिली जाते. हे काम करण्यासाठी मोबाईल, दुचाकी आणि फूड लायसन तरुणाकडे असणे आवश्यक आहे. त्यांना कमिशन तत्त्वावर मोबदला मिळतो. पेट्रोल भत्ता मिळत नाही.

साधारणत: दरमहा १२ ते १८ हजार रुपयांची कमाई होते. वस्तू पोहोचविण्याचे काम करणाऱ्याला डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, तर खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा डिलिव्हरी पार्टनर असा उल्लेख केला जातो. आपल्या सोईनुसार काम करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने रोजगाराच्या या नव्या क्षेत्राला तरुणाई पसंती देत आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, ते वाढत आहे.

........................................................................................

काम आणि मोबदला असा

ग्राहकाने त्याला हवे असणारे जेवण, नाष्टा अथवा वस्तूंचे ऑनलाईन पेमेंट करून अथवा कॅश ऑन डिलिव्हरीची नोंदणी संबंधित कंपन्यांचे संकेतस्थळ, दूरध्वनी अथवा मोबाईल अ‍ॅपद्वारे केल्यानंतर त्याबाबतचा संदेश संबंधित हॉटेल, कंपनी आणि तरुणाच्या मोबाईलवर जातो. ज्या हॉटेलमधून मागणी केली आहे, त्या परिसरातील डिलिव्हरी पार्टनरच्या मोबाईलवर संदेश जातो; त्यामुळे शहरातील विविध हॉटेल परिसरात दुपारी एक आणि सायंकाळी सहानंतर डिलिव्हरी पार्टनरची गर्दी दिसते. या संदेशामध्ये संबंधित मागणी कुठे पोहोच करावयाची त्याचा उल्लेख असतो; त्यासाठी १० ते १५ मिनिटांची वेळ असते. दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री साडेदहा या वेळेत ग्राहकांची मागणी असते. खाद्यपदार्थांच्या प्रत्येक मागणीवर, तर वस्तूवर त्या तरुणाला १३ ते २५ रुपयांपर्यंत कमिशन मिळते. मागणीचा ठरावीक आकडा पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून प्रोत्साहन म्हणून अतिरिक्त रक्कम दिली जाते.

.............................................................................................

प्रतिक्रिया

संयम आणि काम करण्याची तयारी असेल, तर या क्षेत्रात चांगले पैसे मिळतात. पार्ट टाईम काम करून शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या क्षेत्रामध्ये येण्याचे प्रमाण अधिक आहे.

- सुरज कदम, डिलिव्हरी बॉय, सातारा

...................

चिकाटीने काम केल्यास या कामातून बऱ्यापैकी चांगला मोबदला मिळतो. रोजगाराचे नवे क्षेत्र कोल्हापूरमधील तरुणाईला उपलब्ध झाले आहे.

- प्रणव तोडकर, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, सातारा.