शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवा पिढीने ग्रंथवाचनावर भर द्यावा: श्वेता सिंघल, सातारा ग्रंथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 19:55 IST

सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो,

सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो, त्यामुळे युवा पिढीने जास्तीत जास्त ग्रंथ वाचावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील अजिंक्य कॉलनी मैदानावर दि.१८ व १९ नाव्हेंबर या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, प्रा. श्रीधर साळुंखे, कवी प्रदीप कांबळे, नगरसेविका सविता फाळके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजायला मदत होते. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. वाचन ही एक अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो. ज्ञानामुळेच आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यासाठी आपण स्वत:ला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमूल्य ठेव असते.

ग्रंथांचे महत्त्व शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक कुटुंबाने एकतरी ग्रंथ विकत घेऊन तो आपल्या घरात युवकांना वाचनास द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ग्रंथ हे प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्रीधर साळुंखे म्हणाले, ग्रंथवाचनाने खरे जीवन जगता येते. ग्रंथाच्या सानिध्यात राहिलेला माणूस हा समाजातील चांगला माणूस म्हणून पुढे येतो. ग्रंथ वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे. यामुळे चांगला समाज निर्माण होईल. ग्रंथ वाचनामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम ग्रंथ करतात. ग्रंथ हे आपले खरे मित्र असून, ग्रंथ प्रत्येकाने वाचले पाहिजेत. जिल्'ात ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढली पाहिजे.’या कार्यक्रमाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. दीपक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नंदा जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सातारा येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल शेजारी संभाजीराव पाटणे, डॉ. राजेंद्र माने, अमित सोनावणे, सविता फाळके, श्रीधर साळुंखे.