शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युवापिढी नवक्रांतीने देशाची प्रतिष्ठा निर्माण करेल

By admin | Updated: January 11, 2016 00:49 IST

सेवागिरी यात्रा : पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

पुसेगाव : ‘भारतात युवकांची संख्या मोठी आहे. आपल्या हातातील शक्तीचा, अंतरीम मानसिक व शारीरिक ऊर्जेचा योग्यरितीने वापर केला तर युवापिढी नवक्रांती घडवू शकते,’ असा विश्वास पंढरपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तमराव मुधोळकर यांनी व्यक्त केला.खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव, सुभाष अप्पा जाधव, बाळासाहेब जाधव, पोपटराव जाधव, एम. आर. जाधव, प्राचार्य हैबतराव नांगरे-पाटील, प्रा. एम. एस मुजावर, प्रा. डी. पी. शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र घाडगे, मुख्याध्यापिका उषादेवी जाधव, प्रा. संजय क्षीरसागर, डॉ. अंबादास कदम उपस्थित होते.डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘आजची युवा पिढी चांगल्या मार्गाला गेली तरच देशाची प्रगती होईल. त्यांच्या विचारांना देवस्थानच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. मुजावर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आज शरीरसौष्ठव स्पर्धा, श्वान प्रदर्शनयात्रास्थळावर उभारण्यात आलेल्या सेमिनार हॉलमध्ये दि. ११ रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ५० ते ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० ते ७५,७५ ते ८० व ८० किलो वजनी गटांवरील असे गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. श्री सेवागिरी किताब २०१६ च्या मानकऱ्यास १० हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच विविध जातींच्या श्वानांचे प्रदर्शन होणार आहे.