शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

युवांना आता ‘जिमचं याड’ लागलंय!

By admin | Updated: June 17, 2016 23:28 IST

साताऱ्यात नवी क्रेझ : महाविद्यालयीन प्रवेशाबरोबरच व्यायामाकडे वाढतोय युवांचा कल

सातारा : ‘सैराट’ बघून बेधुंद झालेले अकरावीतील नवागत महाविद्यालयाबरोबरच जिमच्याही पायऱ्या झिजवू लागले आहेत. महाविद्यालयात झोकात प्रवेश करायचा असेल तर फिजिकल उत्तम पाहिजे, हे ‘याड’ डोक्यात आल्यानं आता अनेक परशा अन् काही आर्ची जिममध्ये जाऊन कष्ट करत आहेत.पेन्शनरांचे गाव म्हणून साताऱ्यात जिमची संस्कृती यायला तसा उशीर झाला; पण तरीही आता या संस्कृतीकडे वळणाऱ्यांमध्ये सोळा वर्षांपासून सत्तरीपर्यंतचे अनेकजण नित्यनियमाने येऊ लागले आहेत.निम्मी सुटी झाल्यानंतर आलेल्या या चित्रपटाने तरुणाईच्या अनेक पसंती बदलायला लावल्या. दहावी परीक्षेनंतर मनमौजी पद्धतीने बागडणारी मुलं ही व्यायामाविषयी जागरूक झाली. त्यामुळेच जिममध्ये प्रवेश घेताना ‘खूप जास्त बॉडी नको; पण परशासारखं नेटकं दिसावं, असं वाटतंय,’ हे वाक्य अगदी ठरलेले. मुलींमध्ये पूर्वी चवळीची शेंग ही संकल्पना मागे पडली आहे. आता खाता पित्या घरची वाटली पाहिजे म्हणून वजन वाढविण्यासाठी तरुणी जिमचा रस्ता धरत आहेत. (प्रतिनिधी)जिममध्ये हे आहे का नक्की तपासा!जिममध्ये गेले की स्थूलता कमी होते किंवा तुम्ही सुडोल होता हा गैरसमज आहे. शरीर शास्त्राच्या अभ्यासाबरोबरच समोरच्याला कोणते व्यायाम झेपतील याचे शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्याकडेच तुम्ही जाताय का? याची खात्री तरुणाईने करावी. अनेकदा अप्रशिक्षित हातांमध्ये गेल्याने शरीराला भलत्याच व्याधी जडतात. हा धोका टाळायचा असेल तर त्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षक जिममध्ये असावा.कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला शासनाचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. शहरात अनेक गल्ल्यांमध्ये बेकायदेशीरपणे विनानोंदणी अनेक जिम सुरू आहेत. वास्तविक शासन दरबारी नोंदणी असलेल्या जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षक असण्यावर भर दिला जातो. त्यामुळे व्यायाम करायला जाणाऱ्या प्रत्येकाने आपल्या जिमला नोंदणी पत्र आहे का? याची विचारणा करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने या दृष्टीने आता जागरूक राहणे आवश्यक आहे.वर्कआऊट करतानाही ‘झिंगाट’गाणंजिममध्ये व्यायाम करताना शरिराला विशिष्ट लय मिळावी म्हणून सर्वच जिममध्ये हिंदी आणि इंग्रजी गाणी वाजवली जातात. पहिल्यांदाच, शहरातील जवळपास सर्वच जिममध्ये झिंग झिंग झिंगाट हे मराठी गाणे वाजवले जात आहे. व्यायाम करणाऱ्यांनाही आता या गाण्यावर व्यायाम केल्याचा वेगळाच आनंद अनुभूती मिळत असल्याचे बोलले जाते.जिमला जाण्यासाठी : फिटनेस फंडा एकच तंत्रवाढलेले वजन अनेक आजारांना आमंत्रण देते. साताऱ्यात गेल्या काही वर्षांपासून स्थूलता आजाराचे स्वरूप धारण करत आहे. अगदी तिशीतही रक्तदाब आणि मधुमेह जडलेल्यांची संख्या आता वाढलेली दिसते. भविष्यातील आजारांवर नियंत्रण मिळवायचे म्हणून आता जिमला जाण्यात ज्येष्ठांचा आकडाही वाढू लागला आहे. शहरातील काही जिममध्ये तर महिन्यातून तीनदा मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून व्यायाम आणि आहार याविषयी माहिती दिली जाते. पिळदार स्नायू बनविण्याबरोबरच आकर्षक व्यक्तिमत्त्व दिसावे, यासाठी अनेकांना जिमचा आधार वाटतो. जिममध्ये जाणाऱ्यामधील सुमारे ८० टक्के नागरिक फिटनेससाठी जात असल्याचे प्रशिक्षित प्रशिक्षक उमेश मोहोटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.