शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराजवळ तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: June 30, 2016 23:57 IST

आजाराला कंटाळल्याची चिठ्ठी : विषारी औषध प्राशन करून चाकूने भोसकून घेतले

सातारा : मर्ढे (ता. सातारा) येथील जगेश महिपती शिंगटे (वय २५) याने भर्गोराम मंदिरालगत विष पिऊन व चाकूने स्वत:वर वार करून आत्महत्या केली. ‘आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे,’ अशी चिठ्ठीही त्याच्या खिशात सापडली आहे.विरमाडे (ता. वाई) येथील भर्गोराम मंदिरालगत असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामी समाधीजवळ हा प्रकार उघडकीस आला. जगेश बुधवारी मध्यरात्री दुचाकीवरून या मंदिराजवळ आला. शेतीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध पिल्यानंतर त्याने स्वत:च्या दोन्ही हातांच्या शिरा कापून घेतल्या. तसेच छातीवर चाकूने तीन वारही करून घेतले. त्याचा मृतदेह पाहून ही हत्या की आत्महत्या, असे संशयास्पद वातावरण तेथे निर्माण झाले होते. मात्र, जगेश याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ‘आपण आपल्या शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून आत्महत्या करत असून, माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये. माझ्या आजारपणास आतापर्यंत भरपूर खर्च झाला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना प्रथम त्याचा मृतदेह दिसला. त्यांनी त्याबाबतची माहिती भुर्इंज पोलिसांना कळविली. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)