शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसाशी अश्लील संभाषणप्रकरणी युवकास अटक

By admin | Updated: February 10, 2015 00:06 IST

‘डायल १००’वर घडला प्रकार : मोबाईल क्रमांकावरून पोलिसांची कारवाई

सातारा : पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात ड्युटीवर असणाऱ्या एका महिला पोलिसाशी ‘डायल १००’ वरून अश्लील संभाषण करणाऱ्या एका युवकास सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ज्या मोबाईलवरून ‘डायल १००’वर कॉल आला होता, तो क्रमांक पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित युवकाला अटक करण्यात आली. निखिल मोरेश्वर यादव असे या युवकाचे नाव आहे. सातारा पोलीस मुख्यालायतच नियंत्रण कक्ष असून, येथून जिल्हा पोलीस ठाण्यातील घटना त्याचबरोबर इतर माहितीचे संकलन केले जाते. येथे ‘डायल १००’वर दररोज शेकडो कॉल येतात. यापैकी अनेक कॉल ‘फेक’ असतात. परिणामी हे कॉल घेण्यातच नियंत्रण कक्षातील अनेकांचा वेळ जातो. कोणत्याही कॉईनबॉक्स अथवा मोबाईलवरून ‘डायल १००’वर कॉल सुविधा मोफत असल्यामुळे लहान मुले अनेकदा त्याचा गैरफायदा घेतात आणि ‘डायल १००’वर कॉल करून पोलिसांना त्रास देतात. त्याचा फटकाही पोलिसांना अनेकदा बसला आहे. रविवारी याचा फटका चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच बसला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार, दि. ८ रोजी सकाळी संबंधित महिला पोलीस कर्मचारी सेवा बजावत असताना एका युवकाचा मोबाईलवरून ‘डायल १००’वर कॉल आला. यावेळी त्याने अश्लील संभाषण केले. दरम्यान, संबंधित महिला कर्मचाऱ्याने अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्या मोबाईवरून कॉल आला, तो क्रमांक पोलिसांना मिळविला आणि ज्या कोणी कॉल केला होता त्याचा शोध घेतला. दरम्यान, हा कॉल निखिल मोरेश्वर यादव (वय २४, रा. सोळशी, ता. कोरेगाव) याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला दुपारी दोन वाजता अटक केली. (प्रतिनिधी)