शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जोश अन् उत्साहात तरुणाई थिरकली ;कोरेगावमध्ये युवा महोत्सवास उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:52 IST

कोरेगाव : वर्षभर महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव युवकांसाठी एक पर्वणीच... ...

कोरेगाव : वर्षभर महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव युवकांसाठी एक पर्वणीच... त्यामुळे कधी ढोलकीच्या तालावर तर कधी संबळाच्या ठेक्यावर तरुणाईने ताल धरला. अंगावर शहारे आणणारी एकापेक्षा एक सरस नृत्यकला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकण्याचे काम या तरुणाईने केले.शिवाजी विद्यापीठ आणि डी. पी. भोसले कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून कोरेगावात जिल्हास्तरीय ३८ व्या युवा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, अ‍ॅड. सुनीता जगताप, चित्रलेखा माने-कदम, प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर, धनसिंग कदम, प्राचार्य डॉ. वाय. बी. गोंडे, प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, प्राचार्य डॉ. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. विद्या नावडकर यांनी स्वागत केले. प्रा. संगीता वीरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बी. बी. मदने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.स्पर्धेत ४० महाविद्यालयांमधील ८२० स्पर्धकांचा सहभाग युवा महोत्सवामध्ये लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, भारतीय समूहगीत, सुगमगायन, एकांकिका, लघुनाटिका, मूकनाट्य, नकला, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, वादविवाद आदी स्पर्धा उत्साहात झाल्या. जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांमधील ८२० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी उपस्थित तरुणांनी सर्वच संघांच्या नृत्याविष्काराला टाळांचा कडकडाट तसेच शिट्ट्या वाजवून भरभरून दाद दिली.