सातारा : पत्नीकडे का पाहतोय म्हणत एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर, ता. खटाव येथे घडली. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रय शिवाजी घनवट, सतीश घनवट, अंकुश घनवट (सर्व रा. राजापूर, ता. खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय बाजीराव मदने (वय २६, रा. राजापूर, ता. खटाव) याला संबंधितांनी पत्नीकडे का पाहतोय, असं म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. एवढेच नव्हे तर त्यााच्या डोक्यात एकाने दगडही घातला. यामध्ये अक्षय जखमी झाला. या प्रकारानंतर त्याने पुसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास हवालदार माने हे करत आहेत.