शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला

By प्रमोद सुकरे | Updated: November 12, 2022 20:19 IST

"३ महिने वेळ काढून भारत यात्रा करा खरी वस्तुस्थिती कळेल"

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही चांगली बाब आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता जवळजवळ सगळे जग फिरून झाले आहे. त्यांनी आता जरा जवळून देशही फिरून पहावा .म्हणजे त्यांना खरी वस्तूची समजेल अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी  केली. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, प्रमोद जगदाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे, प्रवक्ते अँड . संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, राजकारणाचा स्तर सध्या अत्यंत खालच्या पातळीवरती गेलेला आहे. ही बाब लोकांना न पटणारी आहे. चुकीची भाषा वापरणाऱ्यांना जनता योग्य वेळी त्यांची जागाही दाखवतील.

मध्यावधीची शक्यता वाटत नाही- राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे का ?याबाबत विचारता शेट्टी म्हणाले ,हे सगळे सत्तेला लालसावलेले लोक आहेत. ते सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतील. वाटल्यास त्यानंतर भांडतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटत नाही.

त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय?- सीबीआय ईडीच्या वापराबाबत खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करून ईडीवर ठपका ठेवला आहे. याकडे लक्ष वेधले असता, न्यायालय तीन महिने काय करत होते? त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय? असा सवालही  त्यांनी केला.

मी बारीकसारीक संघटनेकडे लक्ष देत नाही- सध्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे देखील ऊस दर प्रश्नी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारताच शेट्टी म्हणाले, मी सध्या बारीक-सारीक संघटनेकडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaju Shettyराजू शेट्टी